काँग्रेसचे डझनभर खासदार अन् 40 आमदार भाजपच्या वाटेवार? दोन आठवड्यात होऊ शकतो पक्षप्रवेश
Indian General Election, 2024 : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगाही भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उडत आहेत. भविष्यात काँग्रेसचं आणखी नेते भाजपात जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. दोन आठवड्यात निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणुकीची (Indian general election, 2024) घोषणा होऊ शकते. त्यामुळे देशातील सर्वच पक्षानं जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपनं (BJP) या लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचं उद्धिष्ठ ठेवलेय. त्यासाठी इतर पक्षांच्या निवडक नेत्यांसाठी पक्षाची दारं खुली ठेवली आहेत. नुकताच महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केला. चंदीगढमध्ये तीन नगरसेवकांनी विनोद तावडेंच्या (Vinod Tawade) उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तर राजस्थानमध्ये काँग्रेस आमदार महेंदरजीत मालवीय यांनीही भाजपचं कमळ हातात घेतलं. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा खासदार मुलगाही भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उडत आहेत. भविष्यात काँग्रेसचं आणखी नेते भाजपात जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय. महाराष्ट्रातही काही काँग्रेस नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नितेश राणे आणि सुजय विखे पाटील यांनी राज्यातील काही काँग्रेस नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील काँग्रेसचे तब्बल 12 खासदार, 40 आमदार आणि इतर महत्वाचे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील दोन आठवड्यात त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो.
विनोद तावडेंसह 4 नेत्यांची समिती -
काँग्रेसधील 12 खासदार, 40 आमदारांसह काही बडे नेते भाजपात प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर पक्षामधीलही काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यात भाजपात मोठं इनकमिंग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेत्यांच्या प्रवेशाची तपासणी करण्यासाठी भाजपकडून चार नेत्यांची समिती स्थापन केली आहे. विनोद तावडे, केंद्रीय मंत्री बूपिंदर यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्बा आण बीएल संतोष या चार जणांची समिती भाजपात होणाऱ्या इनकिंमवर काम करत आहेत. चार जणांची समितीचं लक्ष भाजपचं वर्चस्व असणाऱ्या चार राज्यात असेल,जिथं भाजपचं मोठं अस्तित्व आहे तरीही जागा जिंकू शकत नाहीत, त्या जागा जिंकण्यासाठी भाजपनं रणनिती आखली आहे.
भाजपची रणनिती काय ?
भाजपची चार जणांची समिती काही खास राज्यावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मिर, मध्य प्रदेशमधील जास्तीत जास्त जागांवर भाजपचं लक्ष आहे. येथे भाजपला जास्त जागा जिंकायच्या आहेत. 2019 मध्ये जिंकलेल्या जागाव्यतिरिक्त 25 पेक्षा जास्त जागा भाजपला या राज्यातून हव्या आहेत. त्यासाठी भाजपनं शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहे.
इतर पक्षातील मतब्बर आणि दिग्गज नेते भाजपात आले तर पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि इतर काही राज्यात भाजपाच्या लोकसभेच्या दहा जागा वाढू शकतात, असा अंदाज समितीचा आहे. चार जणांच्या समितीचं पंजाब, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवर लक्ष असल्याचं समजतेय. उर्वरित दक्षिणेकडील राज्यात भाजपनं 10 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवल्याचं समोर आले आहे.
पुढील दोन ते तीन आठवड्यात देशभरात भाजपमध्ये मोठं इनकमिंग होऊ शकतं, असा अंदाज आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मेगाप्लॅन तयार केला आहे. काँग्रेसचे 12 पेक्षा जास्त खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचं समजतेय. त्याशिवाय 40 पेक्षा जास्त आमदार आणि मातब्बर नेतेही भाजपात प्रवेश करु शकतात.