Laxman Hake : ओबीसींची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित दिसेल; निवडणुका जाहीर होताच लक्ष्मण हाके यांचा आक्रमक पवित्रा
Laxman Hake : संपूर्ण देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल अखेर आज फुंकल्या गेले आहे. अशातच यावर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Laxman Hake बीड : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) चे बिगुल अखेर आज फुंकल्या गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे राज्याचे राजकारण तापले असताना या आंदोलनाचे पडसाद आगामी निवडणुकांवरही उमटणार असल्याची शक्यता आहे. अशातच यावर भाष्य करताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगेंचा पाठिंबा घेणाऱ्या पक्षाला मतदान करायचं नाही- लक्ष्मण हाके
ओबीसींची भूमिका आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित दिसेल. ओबीसी आरक्षणासंदर्भात, आमच्या हक्काच्या लढ्यासाठी ज्या ज्या आमदारांनी आणि त्यांच्या पक्षाने 'ब्र' शब्द देखील उच्चारण्याचे धाडस केलं नाही, अशा आमदारांची लिस्ट आम्ही तयार केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जे जे आमदार पाठिंबा देतील त्या त्या मतदारसंघात आम्ही जाऊ आणि ओबीसी बांधवांना सांगू की ओबीसींचे हक्क टिकवायचे असेल, तुमच्या हक्काचं आरक्षण टिकवायचं असेल तर जरांगेंचा पाठिंबा घेणाऱ्या पक्षाला मतदान करायचं नाही. अशी सरळ आणि साधी आमची भूमिका असेल, असे मत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
राज्यात पुन्हा फुले, शाहू, आंबेडकर जन्माला येणार नाहीत
सध्या घडीला राज्याच्या राजकारणात जे काही ओबीसी नेते आहेत त्यांचा अपवाद वगळता ओबीसींची चांगली फळी देऊ. सर्वसामान्यांचे प्रश्न असो किंवा ओबीसींचे प्रश्न विधानसभेत लावून धरतील, अशी एक ओबीसींची फौज आपण देवू. असेही लक्ष्मण हाके म्हणाले. आपले अधिकार आणि आरक्षण वाचवायचे असेल तर पुन्हा राज्यात फुले,शाहू, आंबेडकर जन्माला येणार नाहीत. तर आपल्यालाच ही लढाई लढावी लागेल. रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांचे संरक्षण करावे लागेल, असे आवाहन राज्यातील एसटी, एससी, आदिवासी धनगर,अल्पसंख्यांकांना असेल असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
हे ही वाचा