(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, धीरज देशमुखांचा पराभव, विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Latur District Vidhan Sabha Election Result 2024 : लातूर जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात महायुतीनं बाजी मारली आहे.
Latur District Vidhan Sabha Election Result 2024 : लातूर जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) 6 मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सुरुवातीचे काही कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, उदगीर मतदारसंघातील निकाल हाती आला आहे. या मतदारंसगातून अजित पवार गटाचे संजय बनसोडे विजयी झाले आहेत. तर निलंगा मतादरसंघातूनसंभाजी पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत. तसेच अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत. तर औसा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांचा पराभव झाला आहे. भाजपचे रमेश कराड विजयी झाले आहेत. तर लातूर शहरमधून अमित देशमुख हे 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर अशा दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. दरम्यान, बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी लातूर जिल्ह्यात 66.91 टक्के मतदान झाले आहे. आता लातूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लातूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यामध्ये लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर या मतदारसंघाचा समावेश आहे. या जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला आहे. या जिल्गह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
लातूर जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
1. लातूर ग्रामीण - रमेश कराड विजयी (भाजप)
2. लातूर शहर - अमित देशमुख विजयी (काँग्रेस)
3. अहमदपूर - बाबासाहेब पाटील विजयी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
4. उदगीर - संजय बनसोडे विजयी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
5. निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर विजयी (भाजप)
6. औसा - अभिमन्यू पवार (भाजप)
लातूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध लढतोय?
1) लातूर ग्रामीण विधानसभा
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत ही
भाजपचे रमेश कराड विरुद्ध काँग्रसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्यात होत आहे.
2) लातूर शहर विधानसभा
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने तीन मुख्य उमेदवारातच लढत आहे. यामध्ये काँग्रसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर तर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके निवडणूक लढवत आहेत.
3) अहमदपूर विधानसभा
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायकराव पाटील तर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके हे देकील निवडणूक लढवत आहेत.
4) उदगीर विधानसभा
उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे विरुद्ध
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुधाकर भालेराव यांच्यात लढत होत आहे.
5) निलंगा विधानसभा
निलंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे
अभय साळुंखे यांच्यात लढत होत आहे.
6) औसा विधानसभा
औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने निवडणूक लढवत आहेत.
लातूर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 69.69 टक्के
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – 62.6 टक्के
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – 68.55 टक्के
उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ - 67.11 टक्के
निलंगा विधानसभा मतदारसंघ - 65.75 टक्के
औसा विधानसभा मतदारसंघ - 68.7 टक्के