एक्स्प्लोर

'व्होट जिहाद' प्रकरण तापणार? भाजपचे किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर, बँक घोटाळ्याप्रकणी भेटीगाठी!

हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. 

Nashik: गेल्या महिन्यात बँकेच्या घोटाळ्यातले 125 कोटी व्होट जिहादसाठी वापरले असल्याचा दावा करणारे भाजप नेते व माजी खारदार किरीट सोमय्या उद्या मालेगाव  दौऱ्यावर येत आहे. मालेगाव (Malegaon) येथील नामको बँकेच्या (Merchant Bank) शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. 

बँक फसवणूक प्रकरणी बँकांना भेटी

भाजप नेते व माजी खारदार किरीट सोमय्या उद्या मालेगाव  दौऱ्यावर येत आहे. मालेगावातील बँक फसवणूक प्रकरणी अपर पोलिस अधिक्षकांची भेट घेणार असून ज्या बँकेत फसवणुकीचा प्रकार समोर आला त्या नाशिक मर्चंट बॅंक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांना भेटी देणार आहे.त्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांची देखील भेट घेऊन दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.नोव्हेंबर महिन्यातही सोमय्या यांनी मालेगावला भेट देत मालेगाव बँक फसवणुकीतील रक्कम व्होट जिहादसाठी वापरल्याचा आरोप केला होता.त्यानंतर मालेगावमध्ये ईडीचे छापे पडले होते. त्यामुळे सोमय्या यांच्या मालेगाव दौरा महत्वाचा मानला जात आहे.

ईडीचे छापे अन् 'व्होट जिहाद'

याप्रकरणात ईडीने मुंबईसह अहमदाबाद येथे सात ठिकाणी छापे टाकून 13.50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आता किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हे संपूर्ण प्रकरण व्होट जिहादशी संबंधित असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. मालेगाव व्होट जिहाद घोटाळा (Malegaon Vote Jihad Scam) 1000 कोटींचा असल्याचे त्यांनी म्हटले होते.  लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत देखील 'व्होट जिहाद'चा मुद्दा चर्चेत आला होता. या मुद्द्याला विरोध करण्यासाठी भाजपने एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. विधानसभेच्या निकालानंतर मालेगाव व्होट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election : आप तिसऱ्यांदा सत्तेत की भाजप रोखणार 'आप'चा रथ? Special ReportSpecial Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरणTorres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special ReportSalman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget