एक्स्प्लोर

Jaykumar Gore : विधानसभेला शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला का ? जयकुमार गोरेंच्या जाहीर वक्तव्याने नवीन चर्चा सुरु, बापू म्हणतात...

Jaykumar Gore : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मदत केल्याचं म्हटलं.

सोलापूर : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत भाजपनेच बापूंचा गेम केला का अशी नवी चर्चा आता सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे एक जाहीर वक्तव्य..

सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांचा काल भाजप मध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुख यांनी प्रयत्न केल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. हाच धागा पकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना काही लोकं म्हणतात मी किती दिवस पालकमंत्री असेल.. पण तुम्हाला आमदार करताना मी पालकमंत्री नव्हतो. 

Jaykumar Gore Statement : जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून आठवण करून दिली तुम्ही आमदार होताना जयकुमार गोरे यांनी मदत केली म्हणून तुम्ही आमदार झाला तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो. आमदार होताना माझी मदत चालली असे सांगत गोरे यांनी बाबासाहेब देशमुख यांना टोला लगावला होता. या सभेत बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणाही गोरे यांनी काल केली होती. 

पालकमंत्री गोरे यांनी सांगोला मध्ये काल केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या पराभवात आपला सहभाग असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. याबाबत बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत निवडणुकीत मला भाजपने मदतच केली चुकून भावनेच्या भरात पालकमंत्री बोलून गेले असतील असे सांगत गोरे यांच्या वक्तव्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. 

शहाजीबापू पाटील यांनी या निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला मात्र 2029 मध्ये सांगोल्यातून शिवसेनेचाच आमदार होईल असे ठणकावून  सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीत सांगोला जागा शिवसेनेकडेच राहील असे सांगत पालकमंत्री गोरे यांचे वक्तव्य खोडून काढले

सांगोला विधानसभा निवडणुकीचा निकाल

सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपकआबा पाटील निवडणूक लढवत होते.  शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 116256 मतं मिळाली होती. तर, शहाजीबापू पाटील यांना 90278 मतं मिळाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपकआबा पाटील यांना 50962 मतं मिळालेली. 

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Shiv Sena Symbol Case :  शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना एकदाचं अपात्र ठरवा, म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधारच नष्ठ होईल; ठाकरेंच्या वकिलांचा मोठा युक्तिवाद
शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना एकदाचं अपात्र ठरवा, म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधारच नष्ठ होईल; ठाकरेंच्या वकिलांचा मोठा युक्तिवाद
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Embed widget