(Source: ECI | ABP NEWS)
Jaykumar Gore on Uttam Jankar: आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कमरेखालीच मारतो; जयकुमार गोरेंचा उत्तम जानकरांवर पलटवार
Jaykumar Gore on Uttam Jankar: माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी दिलेल्या धमकीला मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Jaykumar Gore on Uttam Jankar: सोलापूर जिल्ह्यात (Solapur News) पंचायत राज निवडणुका सुरू होण्यापूर्वीच राजकारणात जोरदार शब्दयुद्ध रंगू लागले आहे. दिवाळीनंतर आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फोडले जात आहेत. माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी दिलेल्या धमकीला पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नातेपुते येथे काल शनिवारी (दि. 25) रात्री भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्याच कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आणि उत्तम जानकर यांना सडेतोड भाषेत उत्तर दिलं.
Jaykumar Gore on Uttam Jankar: आम्ही कमरेखालीच मारतो
उत्तम जानकर यांनी एका युट्युब चॅनेलशी बोलताना पालकमंत्री गोरे यांना “लय मस्ती करू नको, कमरेतून मोडेन” अशी धमकी दिली होती. त्याच धमकीला आता गोरे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. जयकुमार गोरे म्हणाले की, “कसं बोलतोय... आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कमरेखालीच मारतो. मी असे लई बघितलेत,” असे प्रत्युत्तर उत्तम जानकर यांना दिले. या वक्तव्याने सभागृहात एकच जल्लोष झाला.
Jaykumar Gore on Uttam Jankar: थू तुझ्या आमदारकीवर
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, “या लोकांनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी काठ्या खाल्ल्या, केस अंगावर घेतल्या, अजून त्यांचं वळ तसंच आहे, आणि एका आमदारकीसाठी तू पाय चाटत गेलास... थू तुझ्या आमदारकीवर. मी पालकमंत्री झाल्यापासून कोणावरही अशा पद्धतीची टीका केली नव्हती, पण हे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यांना सांगतो की, कुणाला शहाणपणा शिकवतोयस? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझा नाद करू नकोस,” असा इशारा देखील त्यांनी उत्तम जानकर यांना दिला.
Jaykumar Gore on Uttam Jankar: ...तर त्याला सोडत नाही
“आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आपल्या वाटेला आलं, तर त्याला सोडत नाही,” असे देखील जयकुमार गोरे म्हणाले. या वक्तव्यांमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंचायत राज निवडणुकीआधीच सोलापुरात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तम जानकर काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
























