Jayant Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठीची एक कुमक कोणाच्या पदरी आहे, हे सर्वांना माहितीये: जयंत पाटील
Maharashtra Politics: मनोज जरांगेंचं सोडा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का? फडणवीसांचा रोकडा सवाल. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल.
धुळे: राज्यात मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात कोण लोक गेले होते, हे जनतेला माहिती आहे. मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही, यासाठी एक कुमक राज्यात कार्यरत आहे. ही कुमक कोणाजवळ आहे, ही गोष्ट महाराष्ट्राला माहिती आहे, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. ते सोमवारी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी पुण्यातील अधिवेशनात शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, अमित शहा विसरले आहेत की, केंद्र स्तरावरचा पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्याच सरकाराने शरद पवारांना दिला आहे. अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्यांच्याबद्दल बोलत होते, ते आता त्यांच्या समवेतच आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले त्या सर्वांना भाजपने सोबत घेतले आहे. लोकसभेला नरेंद्र मोदी महाराष्टात आले, त्यांना पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला. त्याला जनतेने चोख उत्तर दिले. मोदींच्या नंतर अमित शहा आता शरद पवार साहेबांबाबत बोलत आहेत. त्यांनाही महाराष्ट चोख उत्तर देईल. जेव्हा जेव्हा महाराष्टावर हल्ला करण्याचा प्रयत्न दोघही करतात, त्यावेळी ते विसरतात की, गेल्या काही वर्षांत महाराष्टातले अनेक उद्योग यांच्याच प्रेरणेने गुजरातला गेले आहेत. महाराष्ट्र सरकार याकडे नुसते बघत बसले आहे. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान कोणी केलं, याबाबत जनतेला माहिती आहे. आमच्या महाराष्ट्राचा द्वेष काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधात जनता एकवटल्याशिवाय राहणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटलांचं भाष्य
सरकाराच्या पायाखालची वाळू सरकल्याने अचानकपणे अनेक गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक गोष्टी लाडक्या झाल्या. लोकसभेपर्यंत यांना गोरगरीब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडे बघण्याची उसंत नव्हती. काही झालं तरी आपलेच सरकर येणार, असे भाजपला वाटत होते. देशातल्या जनतेने त्यांना रोखल्यानंतर महाराष्टाने भाजपा विरोधी निकाल दिला. त्यामुळे राज्यातलं सरकारही बदलणार आहे. सरकार वाचवण्यासाठी पुन्हा निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजना हा एक प्रयत्न आहे. पुढच्या पंधरा वीस दिवसात हे आणखीन काही योजनांची घोषणा करतील. ज्याच्यसाठी यांच्याकडे महिन्या दोन महिन्या पेक्षा जास्त पैसे नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा