सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
Jayant Patil on Sachin Waze : "सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्यांचा माझा कधी सबंध होता असे नाही. ANI चा पत्रकार खोदून विचारतो त्याला आरोपी उत्तर देतात,आरोपी मुलखात देतात. फडणवीस यांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे,"
Jayant Patil on Sachin Waze : "सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. त्यांचा माझा कधी सबंध होता असे नाही. ANI चा पत्रकार खोदून विचारतो त्याला आरोपी उत्तर देतात,आरोपी मुलखात देतात. फडणवीस यांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे, त्यात गंभीर काही असल्यास संपर्क करतील. दोन वर्ष काहीच नाही अचानक तुरूंगातील माणूस बाईट देतो. त्याला प्रसिद्धी मिळते", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी (Sachin Waze) आरोप केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे, मी एक पत्र लिहिले आहे : सचिन वाझे
"माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव आहे", असं म्हणत सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सरकारला खुश करण्यासाठी असाव काही लिहिलं असेल पण जनता सुज्ञ आहे
जयंत पाटील म्हणाले, निवडणुका समोर आहेत, त्यासाठी सर्व गोष्टी वापरायचे ठरले आहे, साम दाम दंड भेद वापरले जात आहे. सचिन वाझे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे. त्यांना बाहेर यायचे असेल तर ते असं करत असतील. सरकारला खुश करण्यासाठी असाव काही लिहिलं असेल पण जनता सुज्ञ आहे. माझ्याशी त्यांचा दुरान्वये संबंध नाही. कदाचित त्यानं माझ्याबाबत कौतुकाचे काही लिहिले असेल. शेवटी आता निवडणूक समोर असल्याने सगळ्या गोष्टी वापरायचे ठरवले आहे. साम दाम दंड भेद याचा वापर सुरु आहे. सचिन वाझेला प्रवक्ते पद दिल्यावर असेच होणार काही पक्षांनी त्यांना प्रवक्ते पद दिले आहे. संगिता ठोंबरे काही काम होते म्हणून त्या आम्हाला भेटल्या. पक्षप्रवेशासाठी नव्हे तर कामासाठी आल्या होत्या.
सचिन वाझेच्या आरोपानंतर जयंत पाटलांची पत्रकार परिषद
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना बघितले त्यावेळी मला दु:ख झालं, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका