Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना बघितले त्यावेळी मला दु:ख झालं, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, अमरावती : "हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वाज्वल्य हिंदूत्व सांगितलं, मात्र त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे जेव्हा उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना दिसले. त्यावेळी मला खूप दु:ख झालं."
![Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना बघितले त्यावेळी मला दु:ख झालं, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका Devendra Fadnavis on Uddhav Thackeray I felt sad when I saw Uddhav Thackeray dancing to the beat of the green flag Devendra Fadnavis rude criticism Marathi News Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना बघितले त्यावेळी मला दु:ख झालं, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/03/4f48a01ede31da3e38d701391c37c86a1722686539921924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray, अमरावती : "हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वाज्वल्य हिंदूत्व सांगितलं, मात्र त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे जेव्हा उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना दिसले. त्यावेळी मला खूप दु:ख झालं. आता आपण कोणाकडून अपेक्षा करावी",अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. ते अमरावतीमध्ये बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी लोकसभेत कशामुळे पराभव झाला याची गणितही सांगितली.
आम्ही ते खपवून घेणार नाहीत, सर्वांना या देशात समान अधिकार आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचं मतं एवढचं आहे की, लांगूनचालन चालणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाहीत. सर्वांना या देशात समान अधिकार आहेत. सर्वांना समान संधी असली पाहिजे. एका वर्गाला धरुन यांच्या मतांवर आम्ही निवडून येऊ, असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही? हा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की, हे जे काही याठिकाणी झालं. हा सहयोग नाहीये. हा एक प्रयोग आहे. पहिला प्रयोग कर्नाटकात केला, तिथे यशस्वी झाले. त्यानंतर भारतात प्रयत्न केला आणि आता महाराष्ट्रातही तोच प्रयत्न करणार आहेत.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं सरकार मैदानात उतरलं. गाफील असताना एकदाच खिंडित गाठता येतं. त्यांनी गाठून घेतलं. आता आम्ही गाफील नाहीत. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला हे समजतं की जागं राहावं लागेल. लाडकी बहीण योजना आणली की हे घाबरले. काँग्रेसवाले कोर्टात गेले. आम्ही नाही देऊ शकत म्हणतात. मग राहुल गांधी खटाखट कुठून देणार होते? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
महिलांना एसटीमध्ये सवलत दिली तर एसटीत महिलांचा प्रवास वाढला
महिलांना एसटीमध्ये सवलत दिली तर एसटीत महिलांचा प्रवास वाढला. 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. रिद्धपुरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ करतोय. हनुमान व्यायाम मंडळाला पण मोठा दर्जा दिला. 79 सिंचन प्रकल्प अमरावती आणि लातूर विभागात राबवले, ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. वैनगंगा आणि पैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना याचा भविष्यात खूप फायदा होईल. आपण जर मैदानात उतरलो तर भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही. काहीजण सत्तेत आले की पैसे कमावतात आणि सत्ता गेली की, यांना गरीब आठवतात. सत्ता गेली की यांचे पोपट बोलायला लागतात. यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे, आता फक्त मैदानात उतरा, असंही आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या
राजभेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील BAMS च्या विद्यार्थ्यांना दिली गुडन्यूज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)