Jayant Patil : फडणवीस म्हणाले सोबत घेऊन जातो, पण घेऊन जात नाहीत, आश्वासन पाळत नाहीत; जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये सभागृहात जुगलबंदी
Jayant Patil on Devendra Fadnavis, नागपूर : फडणवीस म्हणाले होते की, तुम्हाला ट्रान्सहार्बरवर सोबत घेऊन जातो. सोबत घेऊन जातो म्हणतायत पण घेऊन जात नाहीत, असं म्हणत जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावलाय.
Jayant Patil on Devendra Fadnavis, नागपूर : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुम्हाला ट्रान्सहार्बरवर सोबत घेऊन जातो. सोबत घेऊन जातो म्हणतायत पण घेऊन जात नाहीत, अनेकवेळा आश्वासन पाळत नाहीत", असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. ते विधानसभेत बोलत होते. ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पावरून जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. इशारो इशारो में काय चाललंय ? सदस्यांकडून विचारणा करण्यात आली आणि सभागृहात एकच हशा पिकला.
जयंत पाटील म्हणाले, राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे. महाराष्ट्रात मोठा प्रकल्प यावा अशी इच्छा आहे. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वर गेले तरी लोकांना काही फरक पडत नाही, त्यांना सवयच झालीय. मुंबई गोवा महामार्गाचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. नितेश राणे आत्ताच मंत्री झालेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे. फडणवीस म्हणाले होते तुम्हाला ट्रान्सहार्बरवर सोबत घेऊन जातो. सोबत घेऊन जातो म्हणतायत पण घेऊन जात नाहीत, अनेकवेळा आश्वासन पाळत नाहीत.
पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात. तुमच्या सर्वांच्या बातम्या देतात. आम्हालाही न्याय देतात. तुम्ही त्यांना 1500 रुपये पेन्शन देणार असं सांगितलं होतं. तुम्ही जी आश्वासन दिली होती. त्याची मी फक्त आठवण करुन देत आहे. 2014 सालच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आयटीपार्क उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. तेच 2019 साली देण्यात आलं होतं. आता पुढील काही वर्षात ते पू्र्ण होईल, अशी आशा व्यक्त करतो. पुणे-नागपूरमध्ये विमानतळ उभारण्याचं आश्वासन होतं. प्राण जाये मगर वचन ना जाए...या प्रमाणे तुम्ही काम कराल. आता तुम्ही स्वत: आलेला आहात. थोडक्यात आमचा प्रचार चुकीच्या ट्रॅकवर होता. हे जनतेच्या निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, अनेक संकल्प पूर्ण झालेली नाही. 2019 मध्ये 1 कोटी रोजगार निर्माण करु म्हटले होते. आता 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही महिलांच्या अत्याचारावर प्रचार केला. शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रचार केला. आमचा ट्रॅक चुकीचा होता. कारण जनतेने त्याबाबत निर्णय दिलेला आहे. माझी सूचना एवढीच आहे की, आजपासून एक अकाऊंट ठेवावं. किती लोकांना रोजगार मिळावा, याबाबतची आकडेवारी ठेवावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं