एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवार सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, जय पवारांना बारामतीत उभं करुन स्वत: रोहित पवारांविरुद्ध कर्जत-जामखेडमधून लढणार?

Baramati Vidhan Sabha: बारामती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी. अजित पवारांचे पुत्र जय पवार हे बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याची दाट शक्यता. अजितदादा रोहित पवारांना भिडणार?

मुंबई: आगमी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत. अजितदादांनी (Ajit Pawar) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरु शकतात, अशा आशयाचे सूचक वक्तव्य केले. बारामतीत जय पवार (Jay Pawar) यांना निवडणुकीला उभे करायचे की नाही, याचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल, असे सांगत अजित पवार यांनी एकप्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून तो रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी मोठा शह ठरु शकतो. कारण अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड  मतदारसंघात (Karjat Jamkhed Assembly constituency) भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. परंतु, यंदा अजितदादा कर्जत-जामखेडमधून रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते. 

रोहित पवारांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात, अशी चर्चा रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या ट्विटमुळे सुरु झाली. अजित पवार यांनी नुकतीच, 'बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात माझ्या पत्नीला उभे करणे ही चूक होती', अशी जाहीर कबुली एका मुलाखतीत दिली होती. अजितदादांच्या (Ajit Pawar) या कबुलीनंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले होते की, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 

अजित पवार बारामतीच्या जागेबाबत नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार  रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

मला रस नाही, मी सात-आठवेळा आमदार, जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीवर अजित पवारांचं रोखठोक भाष्य

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget