दरेकर सत्तेची मस्ती पक्षाला महागात पडेल, मनोज जरांगेंची आगपाखड, म्हणाले, तुला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं म्हणून...
Manoj Jarange on Pravin Darekar: मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. त्यावरुन मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकर यांना लक्ष्य केले.
Manoj Jarange on Pravin Darekar: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange vs Pravin Darekar)आणि प्रवीण दरेकरांमध्ये वाकयुद्ध सुरु असताना दरेकर मस्तीत यायचं नाही. सत्तेची मस्ती पक्षाला महागात पडेल तुझ्या असं म्हणत मनोज जरांगे यांनी दरेकरांवर कडाडून हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजनेसह मराठा आरक्षणावरुन दोघांमध्ये आगपाखड सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री हे माझे राजकीय गुरु आहेत, असे म्हणत दरेकरांनी मनोज जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. यावरून आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांवर निशाणा साधलाय.
...म्हणून तुला मराठ्यांच्या विरोधात बोलणं आहे
तू बँकेचा घोटाळा केला, तुला जगायचं होतं. तुझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपकार केले आणि आमदार केलं. त्यांनी तुझं कुटुंब वाचविले म्हणून तुला मराठ्यांच्या विरोधात बोलणं आहे. तुला जेलमध्ये जाण्यापासून त्यांनी वाचवलं म्हणून तू त्यांचे उपकार फेडायला. असं म्हणत मनोज जरांगे यांनी दरेकरांवर जोरदार टीका केली.
वार पलटवार सुरुच, मनोज जरांगेंची दरेकरांवर खोचक टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. त्यावरुन मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकर यांना लक्ष्य केले. तुम्हाला वेगळेच नाद आहेत म्हणून माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढता असे म्हणत तू क्रांती मोर्चाचं वाटोळं केलं ठोक मोर्चा मोडून काढला. मी तुझ्या खाली बसलो होतो देवेंद्र फडणवीस यांच्या सावली खाली बसला. असे म्हणत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा खोचक टीका केली.
देवेंद्र फडणवीस माझे राजकीय गुरु
जरांगे यांनी रविवारी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गटातील नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर हल्ला चढवला. मनोज जरांगे यांच्या या टीकेला प्रवीण दरेकर यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरु असल्याचा उल्लेख केला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रवीण दरेकर यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. पवारांना त्यांनी आरक्षणाबाबत विचारावं. ते ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला मराठा आरक्षणाबाबत काही विचारत नाहीत. त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास येत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही कुणाला पाडायचं किंवा निवडून आणायचं याच प्लॅनिंग करताय. राजकीय भूमिका घ्यायची असल्यास मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे. जरांगे यांनी राजकीय अजेंडा न राबवता मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
हेही वाचा: