एक्स्प्लोर

मोठी बातमी : इम्तियाज जलील यांना 'एमएआयएम'कडून छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर

Imtiyaz Jaleel from Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आलीये.

Imtiyaz Jaleel from Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) मोठी बातमी समोर आलीये. 'एमएआयएम'कडून छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  'एमएआयएम'चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार 

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेवरुन उमेदवारी देणार आहे. अद्याप ठाकरे आणि शिंदेंचा उमेदवार ठरलेले नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिरंगी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. 

2019 मध्ये तिरंगी लढत झाल्याने जलील यांचा विजय 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघातून तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत मैदानात उतरले होते. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे निवडणुकीत मतविभाजन झाले. याचा फायदा इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना झाला होता. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतं?

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 84 हजार 550 मतं मिळाली. विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना सर्वाधिक 3 लाख 89 हजार 42 इतकी मतं लोकांनी दिली होती. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव 2 लाख 83 हजार 798 मत मिळाली होती. याचाच फटका शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना बसला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी गेल्या निवडणुकीप्रमाणे मतविभाजन होणार का? मतविभाजनाचा फायदा जलील (Imtiyaz Jaleel) यांना होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार?, कुणाला कुठून उमेदवारी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget