एक्स्प्लोर

Amol Kirtikar : अमोल कीर्तिकरांशी ओळख नाही, त्यांची रॅली जात असताना रस्त्याच्या कडेला उभा होतो; भाजपने आरोप केल्यानंतर इब्राहिम मुसा काय म्हणाला? 

Amol Kirtikar Rally : मुंबईतील 1993 च्या बाँम्बस्फोटातील आरोपी असलेल्या इब्राहिम मुसा हा शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकराच्या रॅलीत दिसल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या रॅलीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला इब्राहिम मुसाने उत्तर दिलं  आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही, जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला उभारलो होतो असं इब्राहिम मुसाने स्पष्टीकरण दिलं आहे. इब्राहिम मुसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण या आधीच अमोल कीर्तिकरांनी दिलं होतं. 

काय म्हणाला इब्राहिम मुसा?

अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही. एका लग्नात मी त्यांना दोन मिनिटांसाठी भेटलो होतो. अमोल कीर्तिकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो. मी त्या रॅलीत गेलो नव्हतो किंवा मला कुणी बोलावलं नव्हतं. मी त्या रॅलीत असतो तर माझ्यासोबत आणखी काही लोक असते. मोसिन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो. त्यानंतर मी निघून गेलो.

अमोल कीर्तिकरांचं आरोपांचं खंडन

भाजपने आरोप केल्यानंतर त्याला अमोल कीर्तिकरांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, भाजपकडे दुसरं बोलण्यासारखं काही नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी काहीही काम केलं नाही. त्यामुळेच आता मूळ मुद्दे सोडून हे असं काहीतरी बाहेर काढायचं आणि अफवा पसरवाचं काम सुरू आहे. 

मुंबई बॉम्ब स्फोटात सामील नव्हतो

इब्राहिम मुसाल म्हणाला की, 1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोटामध्ये माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले, त्यामध्ये माझा सहभाग नाही. अभिनेता संजय दत्तला हत्यार दिल्याचा माझ्यावर आरोप ठेवण्यात आला. पण या प्रकरणात संजय दत्तला सोडण्यात आलं आहे. त्यामध्ये माझा सहभाग असता तर मला जन्मठेफ झाली असती. या प्रकरणात मला 10 वर्षांची शिक्षा मिळाली. शिक्षा भोगून आल्यानंतर, 2016 पासून मी घरीच ाहे. त्यानंतर माझ्यावर एकही केस नोंदवण्यात आली नाही. माझ्यावर जे कोण आरोप करतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. लोकांना जे काही बोलायचं आहे ते बोलू देत.

मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा भोगून आलेला इब्राहिम मुसा मविआचा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीवर आरोपांचा बॉम्ब फोडायला सुरुवात केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी झाल्याचा आरोप भाजपानं केला. मात्र मी मुसाला ओळखत नाही असं म्हणत अमोल कीर्तिकरांनी आरोपांचं खंडन केलंय. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी इब्राहिम मुसाने हत्यारं पुरवल्याचा आरोप होता. कोर्टाने त्याला दहा वर्षांची सुनावली होती. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Embed widget