म्हणून मी गुवाहाटीला गेल्यापासून उद्धव ठाकरेंशी बोललो नाही: उदय सामंत
Uday Samant On Uddhav Thackeray: ''मी गुवाहाटीला गेलो तेंव्हापासून उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा ही बोललो नाही. कारण माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे'', असे शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत म्हणाले आहेत.

Uday Samant On Uddhav Thackeray: ''मी गुवाहाटीला गेलो तेंव्हापासून उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा ही बोललो नाही. कारण माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे'', असे राज्यचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत म्हणाले आहेत. पुण्यात माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
उदय सामंत म्हणाले आहेत की, ''शिंदे आणि ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर आम्ही सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेशी बोलावं. ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. मी गुवाहाटीला गेलो तेंव्हापासून उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा ही बोललो नाही. कारण माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे.''
शिवसेनेत विभागणी आम्ही केली नाही: सामंत
उदय सामंत म्हणाले की, ''पुण्यातील माजी नगरसेवक मला भेटले, पुणेकरांच्या वतीने पुढील आठवड्यात मुंबईत अभिनंदन आणि सत्कार करणार आहेत. 18 जुलैला सायंकाळी हा कार्यक्रम पार पडेल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी सुद्धा आज भेटले आहेत.'' ते म्हणाले, ''पहिली शिवसेना आणि दुसरी शिवसेना, अशी विभागणी आम्ही केलेली नाही. आम्ही सगळे शिवसैनिक म्हणूनच भेटलो. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचा ते स्वागत करणार आहेत.''
सामंत पुढे म्हणाले की, ''मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमच्यात नाराजीनाट्य पाहायला मिळेल. म्हणून विरोधक अशी वक्तव्य करतायेत. कोणाला मंत्री व्हायचंय अशातला भाग नाही. त्यामुळं शिंदे आणि फडणवीस ठरवतील त्यांना मंत्रिपद मिळेल. आम्ही त्याचे अधिकार त्यांनाच दिलेत.'' ते म्हणाले, ''विरोधकांनी आमच्यात चलबचल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून खच्चीकरण केलं जातंय, असं भासवलं आणि बोललं जात आहे. पण याबाबत स्वतः दोघांनी वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळं विरोधकांची ही खेळी आहे.''
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ
पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
