कोरोना काळात पंतप्रधानांच्या 'आवडत्या मित्राची' संपत्ती 8 पट कशी वाढली? राहुल गांधींचा केंद्राला प्रश्न
Rahul Gandhi on Pm Narendra Modi: काँग्रेस खासदार राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi on Pm Narendra Modi: काँग्रेस खासदार राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, "कोरोनाच्या काळात पंतप्रधानांच्या आवडत्या मित्राची संपत्ती 8 पटीने कशी वाढली? एका वर्षात पंतप्रधानांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत 46% वाढ झाली? प्रसारमाध्यमे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवत राहिले. पंतप्रधानांचे 'मित्र' खिसे कापत राहिले. मित्रांनी गरीबांची कमाई चोरली.''
आठवडाभरापूर्वीही राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्रावर हल्लाबोल केला होता. त्यांनी ट्वीट केले होते की, "सर्वात गरीब 50% लोकांचा जीएसटीमध्ये 64% योगदान आहे, जीएसटीमध्ये सर्वात श्रीमंत लोकसंख्येच्या 10% लोकांचे योगदान 3% आहे. 'गब्बर सिंह टॅक्स' - श्रीमंतांना सूट, गरिबांना लूट.''
महामारी के दौरान, PM के ‘फेवरेट मित्र’ की सम्पत्ति 8 गुना कैसे बढ़ी?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 22, 2023
एक साल में, PM के ‘फेवरेट मित्र’ की सम्पत्ति 46% कैसे बढ़ी?
मीडिया जनता का ध्यान भटकाती रही, प्रधानमंत्री के ‘मित्र’ जेब काटते रहे।
गरीबों की कमाई, 'मित्रों' ने चुराई।
Rahul Gandhi on Pm Narendra Modi: राहुल गांधी सातत्याने केंद्रावर करत आहेत टीका
ते म्हणाले, "21 अब्जाधीशांकडे 70 कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतातील 40% संपत्ती सर्वात श्रीमंत 1% लोकसंख्येकडे आहे, यूपीएने 20 कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. पंतप्रधानांच्या गरीबी बढाव धोरणांनी त्यांना पुन्हा गरिबीत ढकलले, भारत जोडो यात्रा म्हणजे या धोरणांविरुद्ध देशाचा आवाज आहे.'' दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रा गुरुवारी संध्याकाळी पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दाखल झाली होती. शनिवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर रविवारी हिरानगर येथून यात्रा पुन्हा सुरू झाली.
सबसे ग़रीब, 50% आबादी का GST में योगदानः 64%
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 16, 2023
सबसे अमीर, 10% आबादी का GST में योगदानः 3%
‘गब्बर सिंह टैक्स’ - अमीरों को छूट, ग़रीबों को लूट
Rahul Gandhi on Pm Narendra Modi: श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल
रविवारी सुमारे 25 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर भारत जोडो यात्री चक नानक येथे रात्रीची विश्रांती घेणार आहे. सोमवारी सकाळी ते सांबातील विजयपूरहून जम्मूच्या दिशेने रवाना होतील. 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये संपेल. यात्रेच्या सांगतेत राहुल गांधी तेथील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकावतील.