एक्स्प्लोर

व्हायरल फोटोंवर काँग्रेस उमेदवार अर्चना गौतम म्हणतात, ‘मी बिकिनी गर्ल नव्हते’

UP Election 2022 : मुंबईचा प्रवासही खूप चांगला होता आणि खरे सांगायचे तर, मी तिथे खूप संघर्ष केला आहे. अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला.

Archana Gautam's Interview : मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार (Congress Candidate) अर्चना गौतम (Archana Gautam) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, पण सद्य कामापेक्षा त्यांच्या भूतकाळातील कामाची अधिक चर्चा होत आहे. त्या ‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखल्या जातात. दररोज त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आम्ही अपर्णाशी बोललो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, असे व्हायरल होणे पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक?

उत्तर - जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा मला माहित नव्हते की, माझे पूर्वीचे काम एवढा मोठा मुद्दा बनेल. आता हा मुद्दा मांडला गेल्याने मी समाजाची सध्याची मतं-प्रतिक्रिया बघतेय. जर, माझ्या बाबतीत हा मोठा मुद्दा असेल, तर समाज लहान कपडे घालणाऱ्या महिलांना, कदाचित ग्रामीण मुलींना लहान कपडे किंवा कॅप्रिस किंवा जीन्स घालू इच्छित असलेल्या स्त्रियांना जगूच दिले जाणार नाही. माझ्याबाबतीत असे घडत असेल तर, इतर महिलांच्या बाबतीतही असे घडू शकते. एकीकडे भारताने खूप प्रगती केली आहे, भारतीय पुढे गेले आहेत, मग लोकांची विचारसरणी का पुढे जात नाही?

प्रश्न - तुम्ही काँग्रेसलाच पाठिंबा का देताय?

उत्तर - मी काँग्रेसला पाठिंबा देत आहे, कारण प्रियांका दीदी ज्याप्रकारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहेत, त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावरून तुम्हाला हे देखील कळेल की, त्या 40% तिकीट देत आहेत. त्यामुळे मला वाटते की, त्या तरुणांसाठी काम करत आहे. त्या महिलांचा विचार करत आहेत आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करत आहेत. 

प्रश्न – मुंबई ते मेरठ, बॉलिवूड ते उमेदवारीपर्यंतचा प्रवास, सर्वात मोठे आव्हान काय आहे?

उत्तर - मुंबईचा प्रवासही खूप चांगला होता आणि खरे सांगायचे तर, मी तिथे खूप संघर्ष केला आहे. तिथे ज्या प्रकारची आव्हाने मी पेलली, त्यामुळं मला असं वाटायला लागलं की, आपल्यालाच एवढा संघर्ष का करावा लागतोय. मला असे वाटले की, जर मी हे पूर्ण करू शकले तर, पुढील आव्हाने माझ्यासाठी काहीच नसतील. यासाठी मला संघर्ष करून पुढे जावे लागेल.

प्रश्न – ‘मी एक महिला आहे आणि मी लढू शकते’- ही पक्षाची घोषणा आहे, पण मेरठमध्ये एक महिला असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांकडूनही उमेदवारीसाठी आव्हानांना सामोरे जावे लागले, कारण तुमच्यासोबत ब्रँडिंग येते.

उत्तर - माझे कार्यकर्ते माझ्या समर्थनात आहेत. बघा, मला वाटतं सगळ्यांना तिकीट हवं आहे आणि काही लोकांना तिकीट मिळत नाही, म्हणून ते पण दु:खी होते. पण, लोक आता माझ्यासोबत आहेत आणि ते म्हणतात अर्चना ठीक आहे, तू लढ आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्यामुळेच पक्ष मला खूप सपोर्ट करत आहे. मला कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून, माझे सर्व काँग्रेस बंधू-भगिनीही मला साथ देत आहेत.

प्रश्न – तुम्हाला ‘बिकिनी गर्ल’ म्हणून संबोधलं जातं, याकडे कसं बघता?

उत्तर - मी बिकिनी गर्ल नव्हते, त्यांनी मला बनवले आणि हे नाव माझ्याशी जोडले गेले जे चुकीचे आहे. कारण, तुम्ही मुलीचे पात्र तिच्या नावाशी जोडू शकत नाही. विशेषतः तुम्ही स्वतःच दिलेले नाव. हे चुकीचे आहे आणि असे व्हायला नको होते. उदाहरणार्थ, मी 2018मध्ये ‘मिस बिकिनी इंडिया’ आणि 2014मध्ये ‘मिस यूपी’ बनले. आणि 2018 ही ‘मिस कॉस्मो वर्ल्ड’ही बनले होते, त्यामुळे मी काहीही अतिरिक्त केलेले नाही. इतरांनी जे केले तेच मी केले आहे.  त्यामुळे त्या गोष्टीसाठी जर मला ‘बिकिनी गर्ल’चा टॅग दिला गेला आहे, तो चुकीचा आहे. माझे नाव अर्चना गौतम आहे, म्हणून मला त्याच नावाने हाक मारा.

प्रश्‍न - तुम्ही तुमचं प्रोफेशन बदलता आणि मग नवीन कामावरून लोकांना तुमची ओळख व्हावी असे वाटते, अशावेळी तुमचे जुने काम व्हायरल होते, तेव्हा काय भावना असते?

उत्तर - सुरुवातीला लोक मला सोशल मीडियावर शिव्या द्यायचे आणि अनेक गोष्टी बोलायचे. याशिवाय माझ्या जुन्या पेशाचा गैरवापर देखील झाला आहे.  मला या लोकांवर कारवाई करता आली असती. पण, मला ही गोष्ट पुढे ढकलायची नव्हती. कारण, जेव्हा एखादी मुलगी काहीतरी बोलते, तेव्हा जगाला समजत नाही आणि त्यांना वाटते की, ती प्रसिद्धीसाठी करतेय आणि मी त्या स्टॅम्पला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. जेव्हा मी जिंकेन आणि लोकांसाठी लढेन, तेव्हा या गोष्टी आपोआप थांबतील. जर, तुम्ही एका व्यक्तीचे तोंड बंद केले, तर आणखी जास्त लोक बोलायला पुढे येतील. म्हणून काम करून स्वतःला सिद्ध करणे चांगले आहे.

प्रश्न - तुमच्या विरोधात इतर पक्षांच्या उमेदवारकडे कसे पाहतात?

उत्तर - मला आव्हान, विचारधारेविरुद्ध उभे राहायचे आहे. विरोधी पक्षातील सर्व राजकारणी माझे चांगले मित्र आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे व अनुभवी आहेत.  त्यामुळे माझी कोणाशीही स्पर्धा नाही. विजय आमचाच व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. द्रौपदीने हस्तिनापूरला शाप दिला होता आणि म्हणाली होती की, जिथे स्त्रियांचा सन्मान होत नाही, त्या भूमीचा विकास होत नाही. ती भूमी मागे पडते. द्रौपदीचा हा शाप आजही प्रभावी आहे, असे म्हणतात. हस्तिनापूर आजही विकासापासून वंचित आहे. मात्र, या शापाचा अंत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

प्रश्न- केंद्र आणि राज्य सरकार तुमच्यासाठी काम करत नाही?

उत्तर- अगदी, ते म्हणतात की त्यांच्याकडे द्वितीय श्रेणीचे सरकार आहे. मग, हस्तिनापूर आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, तर हस्तिनापूरसारख्या बलाढ्य शहरात विकास का होत नाही? रेल्वे स्टेशन का नाही? ते का बनवले गेले नाहीत? बसस्थानकही नाही. जर कोणाला इथे यायचे असेल, तर त्याला आधी मेरठला यावे लागेल आणि नंतर तो हस्तिनापूरला येऊ शकेल. त्यामुळे जोपर्यंत रेल्वे स्थानक बांधले जाणार नाही, तोपर्यंत कारखाना उभारणार नाही आणि लोकांना रोजगार मिळणार नाही, हे चुकीचे आहे. तुम्ही राममंदिर आणि काशी बांधली, पण महाभारताची सुरुवात जिथे झाली, तिथे काहीही बांधलं नाही, हा पक्षपातीपणा आहे.

प्रश्न- कपड्यांवर येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून, हे काम व्हायला नको होते असे कधी वाटले?

उत्तर- सर्वप्रथम मी माझा भूतकाळ सांगू इच्छिते. मी एका गरीब कुटुंबातील आहे. मी गायीचे दूध काढले आहे आणि शेणी देखील बनवली आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की, मी एक अभिनेत्री असण्यासोबतच, एक खेड्यातील मुलगीही आहे आणि मी माझी संस्कृती विसरलेले नाही. जर लोक माझ्या कपड्यांबद्दल बोलत असतील, तर तो देखील एक प्रकारचा पेहराव आहे, अभिनयाचे एक माध्यम आहे. स्मृती इराणी असोत, हेमा मालिनी असोत, आधीही बर्‍याच अभिनेत्रींनी केले आहे.  मी देखील ते केले म्हणून, चुकीच्या मार्गाने घेऊन लोक चुकीच्या दिशेने जात आहेत, असे मला वाटते.

प्रश्न- ग्लॅमरच्या दुनियेतून अनेकजण राजकारणात येतात, पण इथे राहणे अवघड आहे, मग त्यासाठी तयारी काय? तुम्ही जिंकलात किंवा हरलात, तर तुमची पुढची तयारी काय असेल? राजकारण सोडणार की नाही?

उत्तर- मी हरण्याचा विचार केलेलाच नाही. आत्तापर्यंत मी नेहमीच जिंकले आहे. मी हस्तिनापूरची कन्या आहे आणि माझा जन्म इथे झाला आहे. त्यामुळे मला वाटते की, हस्तिनापूरची जनता, माझे हस्तिनापूर कुटुंब मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी नक्कीच देईल. प्रसंगी मला स्वतःला सिद्ध करावे लागेल. तरच, मी माझ्यावरील आरोप मागे घेऊ शकेन. मला या जागेचा विकास करायचा आहे. मला इथे रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड बांधायचे आहे आणि शाळेअभावी शाळेत जाऊ न शकलेल्या माझ्या बहिणींना शाळा द्यायची आहे. मला मुलींचे प्रेरणास्थान व्हायचे आहे, जेणेकरून माझ्याप्रमाणेच एखाद्या गरीब मुलीने पुढे जाऊन काहीतरी करावे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget