Sanjay Raut on Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर
Sanjay Raut on Hasan Mushrif : साक्षात देव आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते.
Sanjay Raut on Hasan Mushrif : साक्षात देव आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. मुश्रीफांच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "शाहू महाराज आणि हातकणंगलेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्लीत बसलेल्या त्या विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं. तरी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करू शकणार नाहीत",असं संजय राऊत (Sanjay Raut)यांनी म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
हातकणंगले हा मूळ शिवसेनेचा मतदारसंघ आहे
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रचाराची धुरा संभाळत आहे. या मतदारसंघात महत्वाचे नेते सुद्धा येणार आहेत. हातकणंगले हा मूळ शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा झाली होती. महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला त्यांना तो मान्य झाला नाही. मशाल हाती घेणार नसल्याचं सांगितलं म्हणून आम्ही उमेदवारी दिली. कोल्हापुरात आमची जागा होती पण खासदार तिकडे पळून गेले. अखेर शाहूंनी हात चिन्ह स्वीकारलं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
गद्दाराला परत डोक वर काढू द्यायचं नाही
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही एक तगडा उमेदवार हातकणंगले मधून दिलाय. उमेदवारी जाहीर झाली प्रचाराला वेग आला, झंझावात मशालीचा सुरू आहे. जिथे जिथे गद्दारी झाली त्या गद्दाराला परत डोक वर काढू द्यायचं नाही. या मतदारसंघातील मतदार गद्दार, निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देणार नाही. खडसे शरद पवार यांना सोडून जाणार नाहीत असे मला वाटते. जर ते गेले तर ते त्यांचं दुर्दैव आहे.
आम्ही नारायण राणे यांचा 3 वेळा पराभव केलाय
आम्ही नारायण राणे यांचा 3 वेळा पराभव केलाय आता चौथ्यांदा पराभव करणार आहोत. महाराष्ट्रमध्ये आम्ही 35 जागा जिंकणार आहोत. देशात मोदी 200 जागा ही जिंकू शकणार नाहीत. मतदारांना हेलिकॉप्टरने आणू म्हणणारे हसन मुश्रीफ पैसे ईडी आणि सीबीआयकडून देणार आहेत का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या