शिवसेनेने राष्ट्र हिताला नेहमीच प्राधान्य दिलंय, सेना दिल्ली समोर झुकत नाही, ठाकरे गटाची बैठक शरद पवारांनी गाजवली
Sharad Pawar on Uddhav Thackeray, Baramati : शिवसेना नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देते. शिवसेनेच्या कामाची दिल्लीतही चर्चा असतो. शिवसेना दिल्लीसमोर झुकत नाही.
Sharad Pawar on Uddhav Thackeray, Baramati : "शिवसेना नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देते. शिवसेनेच्या कामाची दिल्लीतही चर्चा असतो. शिवसेना दिल्लीसमोर झुकत नाही. जिथं राष्ट्रचा हिताचा निर्णय येतो तिथे शिवसेना तडजोड करीत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि मी जेवढ एकमेकांवर जेवढे उत्तम शब्द वापरता येतील तेवढे वापरायचो. पण सभा संपली की तासंतास गप्पा मारायचो", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. बारामतीमध्ये ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार बोलत होते. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे गेले याचे दुःख आहे
शरद पवार म्हणाले, चंद्रकांत खैरे ज्या समाजातून येतात त्या समाजाचे लोकसंख्या फार कमी आहे. त्यांच्यामागे दोन हजार लोक देखील येणार नाहीत. मात्र, नेता एकनिष्ठ असेल त्याची पावती मिळते. चंद्रकांत खैरेंना ते मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना संधी दिली. बाळासाहेब ठाकरे गेले याचे दुःख आहे, पण शिवसेनेचे सत्व कसे टिकेल याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे शरद पवारांनी सांगितले.
अनेक जणांना तुरुंगात टाकले
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करतात. त्यांच्याविरोधात आपण लढत आहोत. इंडिया आघाडीत माझा आणि उद्धव ठाकरे यांचा वाटा फार मोठा आहे. चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना दूर करायचं आहे. सत्ता येते आणि जाते लोकांच्यासाठी वापरली तर लोक त्यांचे स्मरण करतात. पण आज सत्तेचा गैरवापर केला जातोय. केजरीवाल मुख्यमंत्री झाले त्यांचे चांगले राज्य चालवले. मोदींच्या समोर नरमनार नाही म्हणून भूमिका घेतली ते आज तुरुंगात आहेत. असेच अनेक जणांना तुरुंगात टाकले, असंही शरद पवारांनी सांगितलं.
पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील
मुख्यमंत्री कुणाला करायचं याची चर्चा सुरू होती. त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या शेजारी बसले होते. मी त्यांचा हात धरला आणि वर केला. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी भूमिका होती. त्यांना रस नव्हता. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं. काही लोकांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले. पक्ष फोडले. देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले आणि त्याठिकाणी सांगितले की, दोन पक्ष फोडले. काय कर्तृत्व आहे? ते सांगत आहेत. फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील. कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत. काही जण दमदाटी करीत आहेत. पण त्यांना माहfत नसेल की दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही, असंही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या