एक्स्प्लोर

Tipu Sultan Controversy : हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, नितेश राणेंचा थेट इशारा; म्हणाले, 'त्यांना महाराष्ट्र कसे फिरू...'

Tipu Sultan Controversy : सपकाळांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली आहे, यावरती आता भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी पोस्ट करत यावरून सपकाळ यांना डिवचलं असून इशारा दिला आहे.

Tipu Sultan Controversy :  टिपू सुलतानबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी (Harshvardhan Sapkal) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलतानानं काम केल्याची मुक्ताफळं सपकाळांनी उधळली. मालेगाव महापालिकेचे उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात भिंतीवर टिपू सुलतानचं तैलचित्र लावल्यानं मोठा गदारोळ झाला. टिपू सुलतानचं तैलचित्र हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर दालनातील तैलचित्र हटवण्यात आलं. मात्र सपकाळांच्या (Harshvardhan Sapkal) वक्तव्यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली आहे, यावरती आता भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी पोस्ट करत यावरून सपकाळ यांना डिवचलं असून इशारा दिला आहे.

Tipu Sultan Controversy : ...मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात

नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय की, "टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात..ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! कांग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! हर हर महादेव !", असं म्हणत एक प्रकारे इशारा दिला आहे.

Tipu Sultan Controversy : हर्षवर्धन सपकाळ यांची सोशल मिडीया पोस्ट

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे", अशी पोस्ट हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget