Gunaratna Sadavarte : डिव्हाइड अँड रुल ही काँग्रेसची हलकट पॉलिसी; अमित शाहांच्या वक्तव्यावरुन गुणरत्न सदावर्तेंची बोचरी टीका
Gunaratna Sadavarte : काँग्रेसची डिव्हाइड अँड रुल पॉलिसी ही हलकट पॉलिसी आहे. एखाद्या वाक्याची तोडफोड करून सांगण्याची प्रवृत्ती असल्याची टीका अॅड . गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय.
Gunaratna Sadavarte धाराशिव : काँग्रेसची डिव्हाइड अँड रुल पॉलिसी ही हलकट पॉलिसी आहे. एखाद्या वाक्याची तोडफोड करून सांगण्याची प्रवृत्ती आहे. एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गाटतील ते सांगता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली. नेहरू संविधानासोबत कसं वागत होतं हे, दाखवण्याचा अमित शहा यांचा प्रयत्न होता. त्याची तोडफोड करण्याचं काम काँग्रेस करत आहे. काँग्रेस, खर्गे आणि राहुल गांधी यांना मला सांगायचं की तोडफोड करून तुम्ही वनवा लावण्याचे काम करू नका. येणारे न्यायमूर्ती शेड्युलकास्ट समाजाचे असतील हा संविधानाचा विजय असल्याची प्रतिक्रिया देत अॅड . गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलंय.
वर्दी घातल्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी, हीच भूमिका असली पाहिजे
मी कोणत्या हत्येचे समर्थन करत नाही. पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी पोलिसांसारखंच काम केलं पाहिजे. ते पोलीस बौद्ध समाजातले असोत, मराठा समाजाचे असोत किंवा वंजारी समाजातील असो. वर्दी घातल्यानंतर समाज नाही. वर्दी घातल्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी, हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्यावर सरकार तपास यंत्रणा योग्य तो रिपोर्ट सादर करतील. मी त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहिलेले नाहीत. परभणी येथील घटनेचा मेडिकल रिपोर्ट पाहिला आहे. अशोक गोरमाड कुठल्या समाजाचा आहे हे मला माहित नाही, त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असेही अॅड . गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
प्रामाणिकपणा याचं दुसरं नाव भुजबळ साहेब- गुणरत्न सदावर्ते
छगन भुजबळ यांच्याशी माझं सकाळीच बोलणं झालं. प्रामाणिकपणा याचं दुसरं नाव भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेब यांच्यासोबत ओबीसी समाज आहे. जरांगे यांच्यासारख्या दिवाणी मोटरसायकल सारखे त्यांचे काम नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावर काँग्रेसने गदा आणली. आईच्या दरबारात माझ्यासारख्या भाविकाला झालेली शिवीगाळ भावना दुखावणारी असल्याचे ही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
अशातच, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर नाराज झालेल्या छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ डागली आहे. नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या सभेमधून भुजबळांनी आता रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. प्रश्न हा माझ्या मंत्रिपदाचा नाही तर उद्या समाजाचे प्रश्न उपस्थित होतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच जर मंत्रिपद द्यायचं नव्हतं तर मग निवडणुकीला उभं कशाला केलंत असा सवालही त्यांनी अजित पवारांना केला. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आपल्यासाठी प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीसही आपल्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते असं सांगत मंत्रिपद नाकारण्यामागे एकटे अजित पवारच असल्याचे अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिले.
आणखी वाचा