Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या जीवाला धोका, सुरक्षा पुरवण्यासाठी राज्यपालांचे पोलीस महासंचालकांना पत्र
Maharashtra Governor Lettter To DGP: राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळ दरम्यान बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे.
Maharashtra Governor Lettter To DGP: राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळ दरम्यान बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. सर्व आमदारांना (शिंदे गटातील) सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याशिवाय आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. यामध्येच सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या पोस्टरवर काळं ही फासण्यात आलं आहे. यानंतर बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सरकारकडे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली होती.
केंद्र सरकारनेही सुरक्षा पुरवली
याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांच्या घरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
जिवाला धोका असल्याचे शिंदे गटाने सांगितले
नुकतेच एबीपी माझाशी संवाद साधताना बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. लोक सध्या नाराज आहेत, त्यामुळे तिकडे (महाराष्ट्रात) जाणे योग्य नाही, असे ते म्हणाले होते. राज्यात परतण्याबाबत ते म्हणाले होते की, आम्ही आता जाऊ शकत नाही, आमच्या जीवाला धोका आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Political Crisis : आता उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल होणार!
Sanjay Raut : संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीमधून 40 आमदारांचे मृतदेह येतील
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर...