Sadabhau Khot & Gopichand Padalkar: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत राहीन, डोळ्यातील अश्रू अन् बिरोबाच्या साक्षीने सदाभाऊ खोतांचं वचन
Sadabhau Khot & Gopichand Padalkar: सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या जोडगोळीचा याराना सर्वश्रूत आहे. सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू, गोपीचंद पडळकरांना म्हणाले...

Sadabhau Khot & Gopichand Padalkar: माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहीन, असे जाहीर वचन रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी दिले आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि मी दोघेही आक्रमकपणे भूमिका मांडत राहिलो नाही तर विरोधक आम्हाला नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत. गोपीचंद पडळकर हे वंचितांसाठी प्रस्थापितांच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहतात. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर राग आहे, असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटले. ते शनिवारी वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील बिरोबा मंदिर सभा मंडप उद्घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत बोलत होते. (Sangli News)
सदाभाऊ खोत यांना आपल्या भाषणात गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना अश्रू अनावर झाले होते. गोपीचंद पडळकर आणि मी समाजातील वंचित , दुर्लक्षित घटकांना जवळ घेऊन प्रसंगी आक्रमक भूमिका घेत त्याचे प्रश्न सोडवतात. जर आम्ही दोघांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या नाहीत तर आम्हाला विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत. त्यामुळे गोपीचंद पडळकर सारखे नेतृत्व जपले पाहिजे आणि ते मोठं केलं पाहिजे. मी तर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन, असे म्हणत असताना सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे बहुजन समाजातील वंचित लोकांचे समाजाचे प्रश्न मांडतात. नाहीतर या लोकांना कुणीही मायेने जवळ घेत नाही. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत समाजातील वंचित , दुर्लक्षित घटकांना जवळ घेऊन त्यांचे प्रश्न सोडवतो. या वंचित लोकांसाठी गोपीचंद पडळकर देखील नेहमी प्रस्थापितांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात. म्हणून प्रस्थापितांचा पडळकरांवर राग आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
Gopichand Padalkar: रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते: गोपीचंद पडळकर
रोहित पवार यांनी मध्यंतरी वाळवा येथील कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख भाजपचं 'डुप्लीकेट सोनं, बेन्टेक्सचं सोनं', असा केला होता. या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, आजोबांनी गेली पन्नास वर्ष सोनं म्हणून पितळ विकलं आहे, चिंध्या विकण्याचा धंदा पवारांनी केलेला आहे. रोहित पवारने माझ्याविषयी काय भाष्य केले, त्यावरती लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते. कारण, रोहित पवार हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला होता, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
आणखी वाचा
रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते; गोपीचंद पडळकरांचा पलटवार























