Madha : गिरीश महाजन दुसऱ्यांदा प्रयत्न करणार, माढ्यातील निंबाळकर-मोहिते पाटील वाद सोडवणार?
Madha Lok Sabha Election : माढ्यातील मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यातील तिढा सोडवण्यासाठी गिरीश महाजन पुन्हा एकदा अकलूजला जाणार आहेत. मोहिते पाटील माघार घेतील अशी आशा निंबाळकरांना आहे.
![Madha : गिरीश महाजन दुसऱ्यांदा प्रयत्न करणार, माढ्यातील निंबाळकर-मोहिते पाटील वाद सोडवणार? girish mahajan to meet Dhairyasheel Mohite Patil on madha lok sabha election akluj vs Ranjit Nimbalkar maharashtra politics marathi Madha : गिरीश महाजन दुसऱ्यांदा प्रयत्न करणार, माढ्यातील निंबाळकर-मोहिते पाटील वाद सोडवणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/29/5940ba78268cc3f7346781b393641ed0171173540777793_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर: भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज पुन्हा एकदा माढ्यातील वाद (Madha Lok Sabha Election) सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. गिरीश महाजन हे अकलूजला जाणार असून मोहिते पाटलांची ते समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. मोहिते पाटील यांची नाराजी लवकरच दूर होऊन ते प्रचारात सहभागी होतील अशी आशा भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjit Nimbalkar) आहे.
माढा लोकसभा उमेदवारीची घोषणा झाल्यापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यात वाद सुरू झाला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक होते, पण भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच दुसऱ्यांदा संधी दिली. त्यामुळे मोहिते पाटील गट नाराज होता.
गिरीश महाजनांनी या आधीही प्रयत्न केले होते
बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी या आधीही गिरीश महाजन यांनी अकलूज गाठलं होतं. पण त्याठिकाणी त्यांना मोहिते पाटलांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण वरिष्ठांच्या कानावर घालू असं सांगत महाजनांनी काढता पाय घेतला होता. आता पुन्हा एकदा गिरीश महाजन हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकरांमध्ये दिलजमाई होणार का हे महाजनांच्या भेटीनंतर समजणार आहे.
मोहिते पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर रणजित निंबाळकरांनीही नाराज सहकाऱ्यांची भेट घेत बैठका घेणे आणि मतदारांना भेटण्यास सुरुवात केली. खासदार रणजित निंबाळकर यांनी आपण केलेल्या कामाची माहिती देत नाराज सहकाऱ्यांच्या प्रलंबित कामाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण?
आपणासाठी विजयदादा हे नेहमीच आदरणीय होते, आहेत आणि राहणार असे सांगून आमच्यातील गैरसमज लवकरच दूर होतील अशी आशा निंबाळकर यांनी व्यक्त केली.
जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेसाठी उभे करणार असल्याचं नुकतंच जाहीर केले आहे. भाजपने यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी पाठवण्याचं ठरवलं. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात दिलजमाई झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह पुन्हा उभे राहणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)