एक्स्प्लोर

Girish Mahajan on Majha Katta : एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा, गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावर ओपन चॅलेंज!

Girish Mahajan on Majha Katta : एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची नेत्याची क्लिप माझ्याकडे होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता.

मुंबई : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) मोठा गौप्यस्फोट केला होता. एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप (BJP) नेत्याची नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर माझ्या मोबाईलमधून ती क्लिप डिलीट झाली, असे त्यांनी म्हटले होते. यावरून आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा, असे ओपन चॅलेंज माझा कट्ट्यावर दिले आहे. 

एकनाथ खडसे यांच्याकडे ज्यात भाजपचे नेते अश्लील चाळे करतानाची क्लिप होती याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे माझ्याबद्दलच बोलत आहेत. मला हे कळत नाही ते कधीपासून म्हणत आहे तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन. मी त्यांना आव्हान केले होते की, तुम्ही ती सीडी बाहेर काढाच. ईडी लागेल की नाही ते मला माहित नाही. पण, दुर्दैवाने त्यांना ईडी लागलीच. त्यांच्या जावयांना अडीच वर्ष जेलमध्ये जावे लागले. तुमच्याकडे काही होतं तर मग तुम्ही बाहेर का काढलं नाही, असे त्यांनी म्हटले. 

मोबाईलमधून गायब करायला मी काय हॅकर आहे का?

ते पुढे म्हणाले की, आपलं कुणाकडून काही वाकडं होत नसेल तर असले आरोप करायचे. कमरेखालचे वार करायचे हा त्यांचा धंदा आहे. वाटेल तसे घाणेरडे बोलायचे हा त्यांचा उद्योग आहे. कोट्यावधी लोक आपल्याला बघत आहेत. याचं त्यांना काहीच वाटत नाही. मी जे बोलेल ते ऐका असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून मी त्यांना आव्हान केलं होतं की, तुम्ही तुमच्याजवळची सीडी दाखवा. तुम्ही लोकांना संभ्रमात ठेवू नका. माझ्याबद्दल जर का त्यांच्याकडे काही असेल तर ते त्यांच्या फोनवरून सहजासहजी गायब होईल का?  त्यांच्या मोबाईलमधून गायब करायला मी काय हॅकर आहे का? हे शक्य आहे का? त्यामुळे ते जे बोलत आहेत त्यात अजिबात तथ्य नाही. 

एकनाथ खडसे आणि माझी नार्को टेस्ट करा

एकनाथ खडसे आणि माझी दोघांची नार्को टेस्ट करा. हे मी जबाबदारीने बोलत आहे. तुम्ही त्यांना विचारा सत्य काय आणि मला पण विचारा सत्य काय आहे. वारंवार भाषणांमध्ये वाईट बोलायचे, माझ्यावर अश्लील आरोप करायचे. माझं ते बाकी काहीच करू शकत नाही. माझ्या खात्याबद्दल काही बोलू शकत नाही. माझ्यावर आरोप करायला त्यांच्याकडे एक शब्द सुद्धा नाही. आपल्याकडून याचं काही वाकडं होत नाही, त्यामुळे हवेत गोळीबार करायचे.

संकट मोचक म्हणून माझं कौतुक करतात म्हणून ते अस्वस्थ

काल ते जामनेरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत माझ्याबद्दल इतके वाईट बोलले की, ते मी इथे सांगू पण शकत नाही. माणूस असं कसं करू शकतं? त्यांची मानसिक स्थिती अत्यंत बिघडली आहे. त्यांना आपण काय करावं हे कळत नाही. त्यामुळे ते मला आणि देवेंद्रजींना टार्गेट करण्याचे काम करतात. बोलायला माझ्याकडे पण चार गोष्टी आहेत. पण, आपल्याला जनाची नाही तर मनाची तरी आहे. तुम्ही माझ्या कामावर बोला. आरोप करा ते सिद्ध करून दाखवा. पण, त्यात मी कुठे सापडत नाही. सगळे लोक मला संकट मोचक म्हणून माझं कौतुक करतात, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मात्र यात त्यांचा दोष नाही, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला.  

आणखी वाचा 

Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Akshay Shinde Encounter : विरोधकांचे गंभीर आरोप; अक्षय शिंदे एन्काऊंटरची बदलापूर फाईलAditya Thackeray On Shinde Encounter : 'त्याला फाशीच व्हायला हवी होती, मात्र जे घडलं ते हलगर्जीपणा'Opposition On Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर विरोधकांचे संतप्त सवालAkshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
महापालिका-झेडपी शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार
Kudal Election : कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
बदलापूर अत्याचाराला शाळा जबाबदार, त्यांनी पैसे देऊन अक्षयला ठार मारलं; पालकांचा आरोप
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं, अक्षयनं बंदूक कसं हिसकावलं?; पोलिसांनीच सांगितला सिनेस्टाईल थरार
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Embed widget