एक्स्प्लोर

पंडीत पाटील विधानसभा लढवणार, जयंत पाटील काय भूमिका घेणार? अलिबागमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरुन शेकापत गृहयुद्ध

अलिबाग विधानसभेच्या (Alibaug Vidhansabha) उमेदवारीसाठी माजी आमदार पंडीत पाटील (Pandit Patil) यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.

Alibaug Vidhansabha Election : अलिबाग विधानसभेच्या (Alibaug Vidhansabha) उमेदवारीसाठी माजी आमदार पंडीत पाटील (Pandit Patil) यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. पंडीत पाटील यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळं शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरुन गृह युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  पंडीत पाटील यांनी माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका देखील केलीय. 

जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत, पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम नेते

शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्या कुटुंबांचा पक्ष नाही, कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण? मात्र कोण एक व्यक्ती उमेदवारीबाबत ठरवू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी त्यांच्या  भावना व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत, पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत असं म्हणत पंडीत पाटील यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. रील्स स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं असं म्हणत जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांना सुद्धा पंडीत पाटील यांनी टोला लगावला. फेसबुक आणि रिल्सद्वारे आमदार होता येत नाही असंही ते म्हणाले.

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी  शेतकरी कामगार पक्षात घरगुती कलह 

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी  शेतकरी कामगार पक्षात घरगुती कलह सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पाटील घराण्यात नक्की कोणाला मिळणार उमेदवारी याची सध्या चर्चा सुरु आहे. 

लिबाग मुरुड मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोठा पेच 

आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्ष, नेतेगण निवडणुकीच्या अनुषंगाने  मोर्चे बांधणी करतायेत. रायगड मध्ये एकेकाळी आपली संघटनात्मक मजबूत पकड असलेला शेतकरी कामगार पक्षही या विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावतोय. सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या शेकापला क्रांतिकारी, लढाऊ आणि पुरोगामी विचारांचा वारसा आहे. आप्पासाहेब नारायण नागु पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील , मोहन पाटील, गणपतराव देशमुख, मिनाक्षीताई पाटील या दिग्गज नेत्यांनी शेकापच अस्तित्व आजवर अबाधित ठेवण्यात यश मिळवले. मात्र मध्यंतरी च्या काळात शेकापला घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली. शेकापक्षाचा ढासळता बुरुज सावरण्यासाठी आजचे नेते सरसावले. विशेषतः देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी मध्ये महत्वाचा प्रादेशिक घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष महत्वाच्या भूमिकेत आहे. मात्र रायगडात अलिबाग मुरुड मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोठा पेच आणि सभ्रम निर्माण झालाय.

जयंत पाटील काय भूमिका घेणार?

या विधानसभा उमेदवारीची माळ शेकापचे वरिष्ठ नेते कुणाच्या गळ्यात घालणार हा प्रश्न असताना पाटील कुटुंबात उमेदवारीच्या मुद्द्यावर धुसपूस सुरु असल्याची बाब समोर येतेय. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, तर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तसेच आस्वाद पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे अंतर्गत वादावर काय भुमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Alibag constituency : शिंदेंच्या बंडानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Embed widget