एक्स्प्लोर

Farmer Loan Waiver: लोकांना कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य

Farmer Loan Waiver: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Farmer Loan Waiver: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा (Maharashtra Rains) कहर सुरू असून अनेक भागांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या जोर धरत आहेत. एकीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकरीही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आठवत सरकारला जाब विचारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली जात असली तरी, त्याचवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. 

Babasaheb Patil: लोकांनी काय मागायचं, हे आधी ठरवावं

लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय.  एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला , लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ठरवावं ना.. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू.. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं.. निवडणुकी आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा, असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. 

Raju Shetti on Babasaheb Patil: राजू शेट्टींचा बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल

यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत. लातूरसारख्या दुष्काळी भागातून ते येतात. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहित आहे. बाबासाहेब पाटील यांच्यासारख्या मंत्री ज्यांच्याकडे सहकार खाते आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुळात शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला. शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी. केंद्र सरकारचे धोरण कुठे चुकले आहे? एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी केंद्रामध्ये जाऊन बसावे आणि तुमच्या धोरणामुळे आमचा शेतकरी कर्जबाजारी होत आहे, असे सांगावे. परंतु, ते शेतकऱ्यांची थट्टा करत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी टीका त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर केलीय.  

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana KYC: अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, 'ही' एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा 1500 रुपये बंद होणार

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget