निवडणूक आयोग कुठल्यातरी दबावाखाली काम करत आहे: एकनाथ खडसे
Eknath Khadse On Election Commission Of India: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादात तारीख पे तारीख मिळत असून सत्तेचा दुरुपयोग करून हे प्रकरण पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
Eknath Khadse On Election Commission Of India: शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादात तारीख पे तारीख मिळत असून सत्तेचा दुरुपयोग करून हे प्रकरण पुढे ढकलण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला या प्रकरणात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निरपक्षपणे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जनसामान्यांना आहे. जनसामान्यांमध्ये ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चेमुळे निवडणूक आयोग सुद्धा कुठल्यातरी दबावाखाली काम करत आहे, हे चित्र लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नसल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री राज्यभरात दौरे करत गणपती, देवीच्या आरत्यांसाठी दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत. मात्र त्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी नुकसानाच्या मदतीपासून, साधी ई पीक पाणी सुद्धा झालेले नसल्याच समोर येत असून हे निंदनीय बाब असल्याचे मत व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहे. ही पीक पाणी झालेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गणपती देवी दर्शन आरत्या या कराव्यात पण मात्र शेतकऱ्यांकडेही लक्ष द्यावे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. मुक्ताईनगर येथील सभेतवेळी बाबत उद्याच निर्णय घेतो, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र याला दहा ते पंधरा दिवस लोटून अद्यापही निर्णय झालेला नाही. जिह्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदित झाला आहे. गुरांच्या लम्पी आजारामुळे त्रस्त शेतकऱ्याच्या बाजूनेही निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादप्रकरणी गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, या वादात आता सीबीआयने जेव्हापासून हा वाद सुरू झालं आहे, तेव्हापासून सुरुवातीपासून चौकशी केली पाहिजे. त्यातलं नेमकं सत्य काय आहे ते समोर आणलं पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. हा गुना मुक्ताईनगरला दाखल झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र या गुणाचे लक्ष आमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात हा गुन्हा मात्र मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या बाहेर रावेर तालुक्यातील निंभोरा येथे झालेला आहे, असे हे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
पीएफआय या संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. यावर सुद्धा एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ बंदच नाही तर या प्रकरणात सहभागी दोशींवर कठोर शासन झाले पाहिजे. भारतात राहायचे आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा द्यायचं हे कदापिही सहन केल जाणार नाही. संबंधितांना अशी शिक्षा व्हावी की त्याची दहशत इतरांमध्ये निर्माण व्हावी व भविष्यात पुन्हा अशी मत कोणीही करणार नाही या पद्धतीने शासन करावे, अशी मागणी ही सरकारकडे एकनाथ खडसे यांनी केली आहे