एक्स्प्लोर

मोठी बातमी : ठाकरेंचे फुटलेले खासदार उद्या शिंदेंच्या मंचावर दिसणार नाहीत, 4 खासदार राजस्थानमध्येच!

Shivsena Operation Tiger : बंडखोरी केलेले खासदार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर दिसतील अशी चर्चा होती. आता मात्र त्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मुहूर्त बदलण्यात आला आहे. 

मुंबई : शिंदेंचे ऑपरेशन टायगर (Shivsena Operation Tiger) जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर सहा खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येत आहे. हे सर्व खासदार 19 जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या मंचावर दिसतील अशी चर्चा सुरू होती. मात्र या खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता बदलण्यात आल्याची माहिती आहे. 21 किंवा 22 जून रोजी हे सर्व खासदार महाराष्ट्रात परत येणार असून त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंची साथ देण्याचं निश्चित केलं आहे. या सहा खासदारांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं आहे. त्या संबंधी अद्याप कोणताही पुरावा किंवा फोटो समोर आला नसला तरी येत्या एक दोन दिवसात संसदेत त्याची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर खासदारांचा हा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे. 

Shivsena Rebel MP News : खासदार महाराष्ट्रात कधी परतणार? 

येत्या 19 जून रोजी गोरेगावच्या नेक्सो सेंटरमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता मात्र त्यामध्ये बदल झाला आहे. 19 जून रोजीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये, शिंदेंच्या व्यासपीठावर हे खासदार दिसणार नाहीत. त्यामुळे या खासदारांविना हा कार्यक्रम पार पडणार आहे.

बंडखोरी केलेल्या या खासदारांचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरमध्ये सहापैकी चार खासदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर दोन खासदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 

या सर्व खासदारांना 21 जून किंवा 22 जून रोजी महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. तोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा झाली असेल. त्यामुळे त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. 

Operation Tiger Timeline : नेमकं काय घडलं?

शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर 16 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता हे बंडखोर खासदार दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांनी या खासदारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. 

या सहा खासदारांनी 17 जून रोजी सकाळी 7 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सहापैकी चार खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव जयपूरमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं तर दोन खासदार इतरत्र गेल्याचं सांगितलं जातंय.

Maharashtra Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळ- वाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

Uddhav Thackeray Shivsena MP List : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार?

1. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)

3. राजाभाऊ वाजे (नाशिक)

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget