Eknath Khadse: पंतप्रधान मोदींकडून पवार ठाकरेंना थेट ऑफर, पण एकनाथ खडसेंनी सांगितला वेगळाच प्लॅन!
Eknath Khadse: रोहिणी खडसे या जरी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा प्रचार करत असतील तर त्या लग्न होऊन आमच्या घरून निघून गेल्या आहेत. त्यांचं कुटुंब आणि आमचं वेगळं आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) शरद पवारांना (Sharad Pawar) दिलेल्या ऑफरसंदर्भात भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सरकार बनवण्यासाठी मदत लागू शकते म्हणून ऑफर दिली असावी असे एकनाथ खडसेंनी म्हटलंय. तर देशात अँटी इन्कम्बसी आहे तरी देखील मोदींचीच सत्ता येणार असल्याच विश्वास खडसेंनी व्यक्त केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, राज्यात आणि देशात मोदींना अँटी इन्कम्बसी आहे. मात्र त्याचा परिणाम झाला तरी मोदींची सत्ता येईल.देशभरात जनतेला मोदी पंतप्रधान व्हावे ही इच्छा आहे. शरद पवार आणि मोदी यांची काल परवाची वक्तव्ये परस्पर विरोधाभासी आहे. मात्र मोदींनी काहीतरी वेगळ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सल्ला दिला असेल. कदाचित सरकार बनविण्यासाठी त्यांची मदत ही घ्यावी लागू शकते.
राजकारणात काही घडू शकते: एकनाथ खडसे
मोदींच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले, पुढच्या राजकारणाची नांदी असावी. राजकारणात काहीही होऊ शकते हे आपण सर्वांनी आतापर्यंत पाहिले आहे. त्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. एखाद्या वेळेस सरकारला मदत लागू शकते. मोदींच्या वक्तव्याचा अर्थ ज्याचा त्याचा त्याने काढावा. राजकारणात काही घडू शकते. आगामी काळात असे घडले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे नेमका अर्थ काढता येणार नाही.
निवडणुका संपल्यावर माझा पक्ष प्रवेश होणार : एकनाथ खडसे
प्रवेशाबाबत वरिष्ठांनी अनुकुलता दर्शवली आहे. काहींनी नाराजी दर्शवली होती. माझ्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चा या केवळ निवडणुकी पुरत्या नाहीत. निवडणुका संपल्यावर माझा पक्ष प्रवेश होणार म्हणजे होणारच आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
रोहिणी खडसे आणि आमचं कुटुंब वेगळं : एकनाथ खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, रोहिणी खडसे या जरी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा प्रचार करत असतील तर त्या लग्न होऊन आमच्या घरून निघून गेल्या आहेत. त्यांचं कुटुंब आणि आमचं वेगळं आहे. माझी मुलगी आहे म्हणून नाव लावून काम करते. आम्ही कुटुंब आहे, निवडणुकीनंतर आम्ही एकाच घरात, एकाच कार्यक्रमात-समारंभात वावरताना दिसू. राजकारणाच्या मतभेदांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ नये, असे मला वाटते.
हे ही वाचा :