Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वैर नव्हतं, विरोधी पक्षात असल्याने भूमिका; एकनाथ खडसेंकडून दिलजमाई करण्याचे संकेत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तीगत वैर नसल्याचे म्हटले आहे.
Eknath Khadse, जळगाव : देवेंद्र फडणीस यांच्या सोबत आपली दुष्मनी नव्हती तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या आपले त्यांच्या सोबत संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणीस सरकार सोबत दिलजमाई करण्याचे संकेत दिले आहेत. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केलीये.
महायुती सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणले ल्या लाडकी बहिण सारख्या योजनांचा परिणाम म्हणून महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त मते मिळाली असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे. ईव्हिएमबाबत आपला विरोध नाही,मात्र अनेक निकाल हे ईव्हीएम बाबत संशय निर्माण करणारे राहिले आहेत. ते दूर व्हायला पाहिजे असंही खडसे यांनी सांगितलं.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विरोधी पक्षातील भूमिका सक्षमपणे पार पाडणे, हीच माझी जबाबदारी आहे. गुलाबराव देवकर यांची व्यक्तिगत भूमिका आहे. माझं राजकीय जीवन पाहिलं तर मी संघर्षामधून पुढे आलोय. आपलं सरकार असो असवा नथो, याची मनात शंका नसते. मी सरकार नसताना 90 साली एकटा आमदार असताना सुरुवात केली. संघर्ष केला, सरकार विरोधात कठोर भूमिका घेतलीये.
मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की, पराभव हा पराभव असतो. रोहिणी खडसेंचा पराभव मी पहिल्याच दिवशी मान्य केला होता. त्यामुळे निकालाच्या संदर्भात मी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, शंका घेण्यात वाव आहे. आम्हाला आमच्या हक्काचे बूथ माहिती असतात. त्याठिकाणी आमचा लीड कमी होतो. त्यावेळी शंका निर्माण होऊ लागली आहे. रोहिणी ताईंनी अपील करण्याचे ठरवले होते. त्यांनी अर्ज मागे घेतला, याची मला माहिती नाही, असंही खडसे यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, ईव्हिएमवर शंका घ्यायला जागा आहे. अनेक उदाहरण आम्ही टिव्हीवर वगैरे पाहतो. कुणाल पाटील यांच्या स्वत:च्या गावात शून मतं आहेत. त्यांच्या गावात त्यांचे 40 मतं आहेत. त्यामुळे शंकेला बळकटी मिळते. महाविकास आघाडी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल. त्याच्या बद्दल काबी प्रश्नच नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही लावून धरु. महायुतीने अनेक आश्वासनं दिली होती. लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार होते. मात्र, आता त्यांनी अटी लावण्यात येत आहेत. तुम्ही जे शब्द दिले आहेत, ते शब्द पार पाडायला हवेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sharad Pawar : आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या, शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं