एक्स्प्लोर

Eknath Khadse : माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला, एकनाथ खडसेंनी पुढची दिशा सांगितली

Eknath Khadse, जळगाव : माझा भाजप प्रवेश गणपती बाप्पासोबत विसर्जत झाला, असं वक्तव आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Eknath Khadse, जळगाव : "गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्रजी म्हटले होते,मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे", असं म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

जामनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार करणार आहेत, हे स्पष्ट झालय. 

मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे

एकनाथ खडसे म्हणाले, मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहे. अनेक वेळा जामनेर तालुक्यात माझ्या सभा झालेल्या असून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

दिलीप खोडप यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

बऱ्याच वर्षांनंतर या ठिकाणी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. त्यामुळे या सभेविषयी उत्सुकता आहे की कोण काय बोलणार...आज दिलीप खोडप यांच्यासह अनेक जण प्रवेश करणार आहेत.

राज्याचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख, त्यांच्यावर आता संकट 

मंत्री सतीश पाटील म्हणाले, मागील काळात आमचे लोक फोडले होते. आता आम्ही त्यांचा माणूस फोडला आहे. राज्याचे संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे,त्यांच्यावर आता संकट आहे. खडसे यांना सोबत घेऊन काम करणार आहेत. चार दिवस पूर्वी गिरीश महाजन यांना तांड्यावर बोलावले होते,या ठिकाणी गिरीश महाजन यांना हाकलून लावले होते. त्या  गावातील कार्यकर्ता चां अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला. तीस वर्षात यांना तांड्या वर रस्ते करता आले नाही.

पुढे बोलताना सतीश पाटील म्हणाले, जळगाव जिल्ह्यात जामनेर,चाळीसगाव, भुसावळ, जळगाव या चार जागा भाजपाच्या येणार नाहीत. राज्यात त्यांच्या 46 जागा येऊ शकतात. शिंदे गटाच्या ही जागा जाणार आहे. हे टपरीवाले असल्याचे सांगतात, त्यांच्या कडे किती पैसा आहे हे सांगता येत नाही,कुंभ मेळाव्यात यांनी पैसे यांनी वाटून खाल्ले. युतीचे सरकार घालायचे आहे,महा विकास आघाडीचा आवाज आता वाढत आहे. पवार साहेब ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी वातावरण बदलत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Mumbai University : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घेण्याचे निर्देश

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
Embed widget