एक्स्प्लोर

फारुख अब्दुल्ला यांची उद्या ED करणार चौकशी, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा प्रकरण

JACA Scam: जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JACA) मधील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची श्रीनगरमध्ये चौकशी करणार आहे.

JACA Scam: जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JACA) मधील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची श्रीनगरमध्ये चौकशी करणार आहे. ते जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे माजी प्रमुख होते. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सुरुवातीला 11 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना 31 मे 2022 रोजी समन्स बजावण्यात आले आहे.

या समन्सनुसार श्रीनगर येथील ईडी कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख असताना हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोप आहे की, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्व नियम आणि अटींना बगल देत अनेक कामे करण्यात आली, त्यामुळे असोसिएशनला 46 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

मनी लाँड्रिंग अंतर्गत समन्स जारी

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सीबीआयने फारुख अब्दुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आता या प्रकरणाचा तपास करत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये फारुख अब्दुल्ला यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला यांना 31 मे रोजी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.

या प्रकरणी ईडीने 11 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे

दरम्यान, 2019 मध्येही या घोटाळ्याबाबत फारुख अब्दुल्ला यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांच्या इतर साथीदारांचीही चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात 11 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सध्या ईडी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून फारुख अब्दुल्ला यांची पुन्हा एकदा चौकशी करणार आहे. या चौकशीमुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होऊ शकतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget