एक्स्प्लोर

Bhaskar Bhagare : मतदारसंघाबाहेरचा अपक्ष उमेदवार, तिसरी शिक्षण अन् भगरे सर नाव कुठून आलं? खासदार भास्कर भगरेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं

Bhaskar Bhagare : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी निवडणुकीत कसा विजय मिळवला याबाबतचे अनुभव एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सांगितले.

मुंबई : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (Dindori Lok Sabha Seat) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात सरपंच ते खासदार या राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. भास्कर भगरे यांनी शिक्षक म्हणून काम करत असताना राजकारणात जाणं स्वप्न असल्याचं म्हटलं. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत करत भास्कर भगरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मिळालेलं ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह आणि त्यांना मिळालेल्या मतांच्या बाबत भाष्य केलं. याशिवाय अपक्ष उमेदवाराच्या नावापुढं सर कसं लागलं याचा देखील उलगडा त्यांनी केला. 

लोकांनी निवडणूक हातात घेतली : खासदार भास्कर भगरे

लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं काम माझ्या सारख्या सर्वसामान्य मतदारांनी केल्यानं सर्वसामान्य शिक्षकाला इथंपर्यंत जाता आलं, असं भास्कर भगरे म्हणाले.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी असा विचार मांडला गेला. तिथं माझ्या नावावर चर्चा झाली होती. पण, आर्थिक ताकद नसल्यानं निवडणूक कशी लढवू शकतो, असा प्रश्न मनात होता, असं भास्कर भगरे म्हणाले. लोकसभा लढवण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याचं माहिती होतं, असंही खासदार भगरे म्हणाले. पक्षात फूट पडल्यानंतर लोकं आमदारकीचे उमेदवार भास्कर भगरे असतील, असं म्हणायचे. नरहरी झिरवाळ यांच्या वेळी लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. तशीच निवडणूक यावेळी देखील लोकांनी हातात घेतल्याचं म्हणाले. 

शिक्षक म्हणून 33 वर्ष सेवा केली आहे. राजकारणात 2005  मध्ये सरपंच होतो. 2007 ते 2017 या काळात पंचायत समितीचा सदस्य, सभापती, उपसभापती पदावर काम केलं. जिल्हा परिषद सदस्य देखील झालो. याशिवाय तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं. निफाडमधील कन्या विद्यालयात एकाच ठिकाणी 30 वर्ष काम केल्याचं भास्कर भगरे म्हणाले. 

अपक्ष उमेदवाराच्या नावापुढं सर कसं लागलं?

अपक्ष उमेदवाराला 1 लाख तीन हजार मतं मिळाली. बाबू सदू भगरे ही व्यक्ती नाशिक तालुक्यातील होती, ती दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नव्हती. उमेदवारी अर्जावर बाबू सदू भगरे असं नाव होतं. निवडणूक आयोग नाव कसं पाहिजे हे शेवटच्या दिवशी विचारतं. मी ओरिजनल शिक्षक असूनही भगरे सर असं लावलं नव्हतं. विरोधी पक्षानं रडीचा डाव खेळून नियोजनपूर्वक डुप्लिकेट उमेदवार उभा करुन तिसरी शिक्षण झालेल्या उमेदवाराच्या नावापुढं सर पदवी लावली. अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट निशाणी दिली गेली. आमचं चिन्ह नवं होतं,  मतं कुणाला द्यायची तर भगरे सरांना द्यायची असा लोकांचा विचार होता. त्यामुळं बाबू सदू भगरे सर या उमेदवाराला मतं गेली. दहा हजार रुपये खर्च करणाऱ्या उमेदवाराला एक लाख तीन हजार मतं गेली. अनेकांनी डावपेच खेळले पण नियतीनं त्यानं यश मिळू दिलं नाही, असं खासदार भास्कर भगरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
 
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget