Shivsena UBT & NCP: शिवसेना ठाकरे गट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही फिस्कटलं?; कालच्या बैठकीत तोडगा नाहीच, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या सविस्तर
Shivsena UBT & NCP: रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ज्या जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे त्यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे शिवसेना एकत्रित येण्याबाबत घडामोडी घडत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युतीची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. काल (मंगळवारी, ता 23) रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ज्या जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे त्यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
Election Seat Sharing: 2017 मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले त्या जागा देण्यास नकार...
कुर्ला विक्रोळी धारावी या भागातील जिथे 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते त्या ठिकाणी जागा देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेने नकार दिला आहे. त्यामुळे कुठेही तोडगा निघत नसल्याचे चित्र असल्याची चर्चा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी 30 जागांचा प्रस्ताव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र 15 ते 20 जागा देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेने जरी तयारी दर्शवली असली, तरी ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हवे आहेत त्या जागा ठाकरेंची शिवसेना देण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेस पक्षाकडे आपला प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्यामुळे जवळपास ठाकरे बंधूसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाण्याची शक्यता कमी दिसत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
BMC Election Seat Sharing: ठाकरे बंधूंच्या युतीचा फॉर्म्युला काय असणार?
शिवसेना ठाकरे गट - 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष -60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार
BMC Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आल्यास फॉर्मुला नेमका काय असणार?
शिवसेना ठाकरे गट - 130 ते 140 जागांवर निवडणूक लढवणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 15 ते 20 जागा शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडणार
सात नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्रित लढणार
मुंबईसह सात नगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष एकत्रित लढणार आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. मुंबईची लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी दुपारी 12 वाजता एकत्र येऊन युतीची घोषणा करतील. तत्पूर्वी हे दोघे भाऊ दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज युतीच्या घोषणेवळी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
नेमका जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटप ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने पूर्ण केल्यानंतर आज युतीची अधिकृत घोषणा होत आहे. नेमका जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार? कोण किती जागा लढवणार? मित्र पक्षांना किती जागा देणार? यासंबंधी एबीपी माझा ने ठाकरे बंधूंच्या युतीचा संभाव्य फॉर्मुला समोर आणला आहे. जागावाटप हे उमेदवाराच्या मेरिटनुसार झाला असून साधारणपणे 60 ते 70 जागा या ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसे पक्षासाठी सोडल्या आहेत तर 140 ते 150 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने आपली उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत जागा वाटपाची बैठक अंतिम टप्प्यात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधुनो सोबत आल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. त्यावेळी अमित शाह उपस्थित होते.
























