एक्स्प्लोर

मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही: धर्मराव बाबा आत्राम

Nagpur News : मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही. तानाजी सावंत यांचे हे व्यक्तिगत मत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. 

Nagpur News नागपूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी बाबतीत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. असे विधान तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी (NCP) बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येतेय.

दरम्यान तानाजी सावंत यांची ही वायरल क्लिप नेमकी कधीची आहे याबाबतीत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच यांच्या सत्यतेबद्दल ही एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र याच वक्तव्यावरुन आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही. तानाजी सावंत यांचे हे व्यक्तिगत मत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) 

यांनी दिली आहे. 

अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही सक्षम उमेदवार देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या 31 ऑगस्टला नागपुरात येत आहेत. दरम्यान त्यांची काटोलमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काटोलवर दावा करण्याचा विषय नाही, काटोल राष्ट्रवादीची जागा आहेच, ती आम्ही मागणारच. किंबहुना अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही तिथे उमेदवार देणार. अहेरी येथेही अजित पवार येणार आहेत. ज्या जागा राष्ट्रवादीच्या आहेत त्यावर आमचे उमेदवार असणारच आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही सक्षम उमेदवार देणार आहोत. मात्र तो उमेदवार नेमकं कोण हे महायुती ठरवेल. तर काही ठिकाणी अदलाबदली होऊ शकते असे मत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. 

राज्यात माझा प्रभाव वाढत आहे. विदर्भात जास्त जागा आम्ही मागत आहोत. त्यामुळे माझ्यावर काही आरोप होत असून निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप होत आहेत. मंत्रिमंडळात तानाजी सावंत माझ्या बाजूला बसतात, त्यांना उलटी करताना मी कधी बघितले नाही, तानाजी सावंत यांचे ते व्यक्तिगत मत असू शकतं. तर मुख्यमंत्री हे मोठे नेते आहेत, यावर त्यांच्याकडून प्रतिक्रिया येणे आवश्यक आहे, तानाजी माझ्याप्रमाणे मंत्री आहेत असेही मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत 

मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असंही तानाजी सावंत म्हणाले होते. 
 
तानाजी सावंत राष्ट्रवादी बद्दल बोलण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांची आणखी एक क्लिप सध्या वायरल होतेय. यामध्ये तानाजी सावंत हे धाराशिव लोकसभा बाबतीत बोलताना दिसतायत. “आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं. ज्याला आपण मतदान करत नव्हतो त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी मतदान करा असे म्हणायला तुमच्यापार्यंत आलो नाही. कारण आपल्यालाच पटलेलं नव्हतं.“ असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येतेय. दरम्यान तानाजी सावंत यांची ही वायरल क्लिप नेमकी कधीची आहे याबाबतीत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच यांच्या सत्यतेबद्दल ही एबीपी माझा पुष्टी करत नाही.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Embed widget