एक्स्प्लोर

राष्ट्रवादीशी आपलं पटत नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात: तानाजी सावंत

Tanaji Sawant : आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र जरी बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. 

धाराशिव : राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असं खळबळजनक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तानाजी सावंतांना जी मळमळ होतेय त्याचा इलाज मुख्यमंत्र्यांनीच करावा अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. 

तानाजी सावंत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आपलं कधीच पटलं नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत पटलं नाही. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही. 

तानाजी सावंतांचा इलाज मुख्यमंत्र्यांनी करावा

तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील. 

जर महायुतीच्या तीनही पक्षांनी एकत्र राहून निवडणूक लढवायची ठरवली असेल तर असं वादग्रस्त वक्तव्य असेल, राणेंचे किंवा आता तानाजी सावंतांचं वक्तव्य असेल हे कशाकरता करतात हे माहिती नाही. त्यांना कशामुळे मळमळ होत आहे हे माहिती नाही. आता तानाजी सावंतांचा इलाज हा मोठे डॉक्टर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. 

तानाजी सावंत हे अशाप्रकारचे वक्तव्य वारंवार करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तंबी द्यावी अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
धक्कादायक! शीतपेय पिल्याने 2 नर्सेसला विषबाधा, उपचार सुरु, धाराशिवच्या कळंबमध्ये घडली घटना 
धक्कादायक! शीतपेय पिल्याने 2 नर्सेसला विषबाधा, उपचार सुरु, धाराशिवच्या कळंबमध्ये घडली घटना 
Vidarbha Rain Deficit : मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!
मुंबई-पुण्यात पुरेपूर; मात्र नागपूरसह विदर्भातील 11 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट; मराठवाड्यातील धाराशिवही तहानलेलाच!

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Embed widget