Dhairyasheel Mohite Patil on Ranjeetsinha Naik-Nimbalkar : एका रात्रीत एक आमदार दिला, 15 दिवसात खासदार दिला, अन् हे आम्हाला गद्दार म्हणतात, धैर्यशील मोहितेंचे निंबाळकरांना जोरदार प्रत्युत्तर
Dhairyasheel Mohite Patil on Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Phaltan : मागील निवडणुकीत कसलाही स्वार्थ न ठेवता. मोहिते पाटील कुटुंबियांनी केवळ आणि केवळ माढा लोकसभा मतदारसंघातील किंबहुना सहा जिल्हे आणि 31 तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी प्रवेश केला होता.
Dhairyasheel Mohite Patil on Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Phaltan : "मागील निवडणुकीत कसलाही स्वार्थ न ठेवता. मोहिते पाटील कुटुंबियांनी केवळ आणि केवळ माढा लोकसभा मतदारसंघातील किंबहुना सहा जिल्हे आणि 31 तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी प्रवेश केला होता. मोहिते पाटील कुटुंबियांनी पक्षाला काय दिले? एका रात्रीत एक आमदार दिला, 15 दिवसात खासदार दिला. जिल्हा परिषद हातात दिली. 3 नगरपालिका दिल्या आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात", असे माढाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले. महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर (Ranjeetsinha Naik-Nimbalkar) यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना गद्दार म्हटलं होतं. त्याला मोहिते पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या प्रचारार्थ फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.
तिथं उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ज्या निगरपालिकांची जबाबदारी घेतली होती, तिथं उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत. नशीब आहे, गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत. नाहीतर कळालं असतं फलटणमध्ये कोणाची ताकद किती आहे, हे समजलं असतं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून समजली यांची ताकद किती आहे. एकच ग्रामपंचायत आली. तिही कार्यकर्त्याच्या जीवावर आली.
बाईकवार इथून पुण्याला दीड तासात जातो
आमची गेल्यावेळी चूक झाली. फलटण तालुक्यातील लोक सांगत होते घेऊ नका. पण तेव्हा काही आमचा स्वार्थ नव्हता. सकाळपासून मी फिरतोय फलटण लोणंद रेल्वे लाईन बघितली. ती पुण्याला जाती. बाईकवार इथून पुण्याला दीड तासात जातो, रेल्वे मात्र, पाच तासात जाते. हे खासदारांचे काम होते, असेही धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी स्पष्ट केले.
उमेदवार आम्हाला परके नाहीत
रघुनाथराजे निंबाळकर (Raghnathraje Nimbalkar) म्हणाले, उमेदवार आम्हाला परके नाहीत. ते पिढ्यानपिढ्याचे नातेवाईक आहेत. ही निवडणूक गंभीर आहे. आपण कधीच विसरु नका. मी कायम पवार साहेबांचा होतो. माझा फेसबुकचा मोटो देखील तोच होता की, आय बिलाँग्स टू एनसीपी.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray on Ram Satpute : अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा; उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर हल्लाबोल