एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना सल्ला

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना आपले चारित्र्य आणि कामकाज निष्कलंक ठेवण्याच्यादृष्टीने काही सल्ले दिले आहेत. फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Warns BJP MLAs: आपल्या पक्षाने जे संस्कार दिले आहेत, ते घेऊनच पुढे  जा. सरकारी कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या आमदारांना दिला. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा. विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे कशात भले आहे, त्याचा विचार करूनच कामे करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. ते गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बोलत होते. 

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हरच्या मुद्द्यावरुनही भाजप (BJP) आमदारांना मार्गदर्शन केले. विरोधकांनी फेक नरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह तयार करा, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर नुकताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला होता. या मेजवानीसाठी महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यं टाळण्याचा सल्ला दिला होता.

Vidhan Sabha Adhiveshan 2025: पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देऊ नका: फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. 'महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा', अशी स्पष्ट सूचना सर्वांना दिली. महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीमधील (Mahayuti) वाचाळवीर आमदारांना दिली होती.

Mahayuti: महायुतीचा महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

महायुती सरकाराचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48 टक्के पदे येतील. शिवसेनेच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महामंडळांचे वाटप करतील.

आणखी वाचा

अखेर मंत्र्यांना मर्जीतले खासगी सचिव नाहीच! दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही पदरी निराशाच

दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलाय का? त्यांनी एकत्र यावं आणि क्रिकेट खेळावं : देवेंद्र फडणवीस

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Embed widget