एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana : सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका, लाडकी बहिण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana, Mumbai : "लाडकी बहिण योजनेबाबत (Ladaki Bahin Yojana) सर्व भगिनींना विनंती करतो की, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा""

Devendra Fadnavis on Ladaki Bahin Yojana, Mumbai : "लाडकी बहिण योजनेबाबत (Ladaki Bahin Yojana) सर्व भगिनींना विनंती करतो की, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकलं, सस्पेंड केलं. त्याला बडतर्फ करण्याचा विचारही राज्य सरकार करत आहे. सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यावर जर सेतू केंद्राने पैसे घेतले तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल. लाडकी बहिण योजना पारदर्शकपणे राबण्याचा आमचा हेतू आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते. 

माझी लाडकी बहिण  ही अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगल्या योजनांची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहिण (Ladaki Bahin Yojana) ही अत्यंत महत्वकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेमध्ये काल काही बदल करण्यात आले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. त्यांना 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

पाच एकर जमिनीबाबतची अट होती, ती आम्ही काढून टाकली 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाच एकर जमिनीबाबतची अट होती, ती आम्ही काढून टाकली आहे. शिवाय 15 दिवस नाही, तर अर्ज भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत आपण दिली आहे. 60 दिवसांमध्ये जे अर्ज करतील, त्यांनी 1 जुलैला अर्ज केलाय, असं समजून दोन्ही महिन्यांचे पेमेंट मिळेल. ऑगस्टनंतर जे अर्ज करतील त्यांना त्या दिनांकापासूनचे पेमेंट मिळेल, असा निर्णय घेण्यात आलाय. 

डोमेसाईलचा दाखल्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्याला आम्ही नवऱ्याचा जन्म दाखला किंवा रेशनकार्ड असे पर्याय दिले आहेत. शिवाय मतदार यादीतील नाव असेल तरी तो डोमेसाईलला पर्याय असणार आहे. त्यामुळे आता रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget