एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अशोक खरात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची सभागृहात हादरवणारी माहिती

Devendra Fadnavis On Ashok Kharat : ज्या ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावे मिळतील त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

मुंबई : आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने (Ashok Kharat) महिलांचे शोषण केलं, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेले निवेदन खालीलप्रमाणे, 

अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला नंतर डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तपास सुरू आहे. 

⁠सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली. ⁠या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. तसेच आपण दैवी अवतार असल्याचं सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठे केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी द्यायचा. 

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. ⁠डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली. 

या प्रकरणात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली, त्यांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यात तयार करण्यात आलं. पिडीत महिलांचे फोटो, व्हिडीओ फेसबुक तसेच सोशल मीडियावरून डिलीट करण्याचं काम सुरू आहे.

अशोक खरातची 33 एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील 40 गुंठे जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आलं आहे. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या ⁠नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे. 

आरोपीच्या ⁠शिवनिका संस्थानची चौकशी करण्यायत येत आहे. या प्रकरणातील ⁠पीडित आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ⁠त्यांच्यासोबत असलेले पुजारी आणि इतर लोकांचेही जबाब घेतले आहेत. ⁠चार पीडित महिलांचे जबाब घेऊन पाच गुन्हे दाखल केले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget