(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadanvis: साताऱ्यात आयटी हब अन् वंदे भारतसाठी मोदींना पंतप्रधान करायचंय, फडणवीसांचं असंही आश्वासन
आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनात आता शंका नाही, कारण 4 जूनला यावं लागणार ते गुलाल उधळायलाच, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यातील भाषणाला सुरुवात केली.
सातारा : राज्यात लोकसभा निवडणुकांच्या (Election) तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात होत आहे. त्यामुळे, निवडणूक प्रचारांसाठी आजचा शेवटचा दिवस असून रविवारी दुपारी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. म्हणून, राज्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका लागला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंही रत्नागिरीतून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांसाठी सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तर, सातारा आणि बारामतीच्या पट्ट्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा होत आहेत. साताऱ्यात (Satara) उदयनराजेंसाठी आयोजित सभेतून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सातारकरांना मोठं आश्वासन दिलंय. साताऱ्यात आयटी हब उभारण्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर माझ्या मनात आता शंका नाही, कारण 4 जूनला यावं लागणार ते गुलाल उधळायलाच, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यातील भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार प्रधानमंत्री होणार नाही, उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्याचा प्रश्न येतं नाही. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या शिवाय देशाला पर्याय नाही, असे फडणवीसांनी म्हटले.
राहूल गांधी यांच्या गाडीला इंजिन आहे, मात्र डब्बेच नाहीत. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. राहूल गांधीच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना जागा आहे. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये जनतेला नाही तर सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. त्यामुळं उदयनराजे यांना मत दिलं की मतांची बोगी थेट नरेंद्र मोदी यांच्या इंजिनला जाऊन मिळणार आहे, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर व त्यांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला.
मोदींनी देशाला आयटी कॅपिटल केलं, त्यामुळं साताऱ्यात आयटी हब, एमआयडीसी, इतकच काय वंदे भारत ट्रेन देखील सुरू करायची आहे, त्यासाठी आपल्याला तिसऱ्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे, असे फडणवीसांनी म्हटले. साताऱ्यातील तरुणाईला आयटी हब आणि एमआयडीसीचं आश्वासनच फडणवीसांनी दिलं.
जाणते राजे शरद पवार म्हणायचे की मोदी यांना उसातलं काय कळतं? त्यांना सांगायचं आहे की, जेवढे निर्णय मोदींनी घेतले तेवढे निर्णय आजपर्यंत कोणी घेतले नव्हते. मोदीनी इथेनॉल मधून देखील पैसे मिळतील याची देखील काळजी घेतली. जास्तीची एफआरपी मिळाली की इन्कम टॅक्सची नोटीस यायच्या. त्यावेळीं मनमोहन सिंह पंतप्रधान होतें. त्यावेळीं शरद पवार 5 वेळा शिष्टमंडळ घेऊन गेले मात्र फुटकी कवडी मिळाली नाहीं. मात्र नरेंद्र मोदी यानी एका झटक्यात निर्णय घेतला. त्यावेळीं शेतकरयांना साठी त्यांनी कायदा मोडला आणि 10 हजार कोटी रुपयांचा टॅक्स रद्द करून टाकला. मोदीना शेतकऱ्याची नाडी कळली होती.
दरम्यान, मोदींनी आता ठरवलं आहे, 33 टक्के महिला आमदार विधानसभेत आणि 33 टक्के महिला खासदार म्हणून लोकसभेत दिसतील
हेही वाचा
'मोदीजी, तुम्ही आजारपणात माझी चौकशी करता पण...; उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, टाळ्या अन् शिट्ट्या