वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार
वडगाव शेरी (Vadgaon Sheri) मध्ये मी तुमच्याच मनातील उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं.
Ajit Pawar : वडगाव शेरी (Vadgaon Sheri) मध्ये मी तुमच्याच मनातील उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. सुनील टिंगरेला (Mla Sunil Tingre) बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. काहीही नसताना लोकप्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकार राज्याला पुढे नेणारे नाहीत असंही अजित पवार म्हणाले. काही लोकं इकडं-तिकडं जातात पण लोकशाही आहे, त्यावर मी टिप्पणी करणार नाही असे अजित पवार म्हणाले. वडगाव शेरी मतदासंघामध्ये अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्धाटन झालं. यावेळी ते बोलत होते.
सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न
एक लोकप्रतिनिधी ज्याने नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलं आहे. सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असल्याचे अजित पवार म्हणाले. कुठलाही प्रकार झाला तर माझ्या पोलिसांना सूचना असतात की सगळ्यांना नियम सारखे लावा असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेतल्याचे अजित पवार म्हणाले. लाडक्या बहिणीच्या योजनेचे सगळे पैसे येतील काहीही काळजी करु नका असेही अजित पवार म्हणाले. सुनील टिंगरे यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं आहे. त्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो असेही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरु
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही दिवसातच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील राज्यभर दौरे करत आहेत. काल त्यांनी वडगाव शेरी मतदासंघामध्ये विविध विकास कामांचं उद्धाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातावरुन सुनिल टिंगरे यांच्यावर आरोप
दरम्यान, कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातावरुन सुनिल टिंगरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांनी आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवलं होतं. या अपघातप्रकरणी टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या: