Dattatray Bharne : इंदापूरमध्ये क्रांती होणार, लायब्ररी, क्रीडा संकुल ते 200 कोटींचा निधी; मंत्री भरणे मामा कडाडले
Dattatray Bharne : दत्तात्रय भरणेंनी इंदापूरच्या विकासाचं व्हिजन मांडलय.
Dattatray Bharne, इंदापूर : "आज शहरात 90-100 कामे सुरू आहेत. 200 कोटींची कामे शहरात सुरू आहेत. शहरात नगरपरिषदेची इमारत उभी राहिली. मागील दीड वर्षापूर्वी 10 कोटी रुपये मंजूर केले. गोर गरिबांच्या मुलांसाठी इंदापूर मध्ये लायब्ररी उभी करणार, यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर केला. क्रीडा खात्याचा मी मंत्री आहे. राज्याचा मंत्री असलो तरी मी इंदापुरचा आमदार आहे. जेवढा निधी आणता येईल तेवढा आणणार, इंदापुरात क्रांती करणार", असं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. इंदापूर मध्ये कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नवीन स्ट्रीट लाईटचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले, लाडक्या बहिणींनी भावासाठी काय केले हे सर्वांना माहित आहे. 2014 पासून मला इंदापूरची सेवा करण्याची संधी दिली. मला अडीच वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी जनतेचा सेवक आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करीन. मला फोटोबाजी मीडिया बाजी आवडत नाही. आई वडिलांनी मला जे संस्कार दिलेत ते मी आयुष्यभर विसरणार नाही. पदाच्या माध्यमातून लोकांसाठी काय करता हे महत्वाचे आहे. 2014 पूर्वी इंदापूर शहरची काय ओळख होती? ही काय जादूची कांडी नाही, यासाठी मी खूप भोगले आहे.
पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, निधी कसा आणायचा मला शिकवायची गरज नाही.तुम्ही शेतकरी कुटुंबातील मुलावर खूप प्रेम केले. माझ्यापुढे मोठ्या शक्ती वाली माणसं उभी होती. पण मला हातगाडी वाल्या माणसांनी आमदार केलं. ज्या झाडाला फळ त्याचं झाडाला लोक दगड मारतात. एखादा ठेकेदार काम खराब करतो. माध्यमांनी जाणीवपूर्वक चुकीचं दाखवण्याचं काम केलं. मला जाणीव पूर्वक बदनाम केलं. जोपर्यंत सामान्य माणसं माझ्यासोबत आहे, तो पर्यंत हा दत्ता भरणे कोणाला भीत नाही. माझ्याकडे अल्पसंख्यांक खातं आहे, तुमचा गैसमज केला गेला पण,माणसं ओळखायला शिका. तुम्हाला दोन वर्षांनी लक्षात येईल, शिरसोडी पुलाचे काम सुरू झाले आहे. यामुळे इंदापूरमध्ये एक क्रांती होणार आहे, असं दत्तात्रय भरणेंनी नमूद केलं.
इथली बाजारपेठ बदलणार आहे. आता कामाचे कोणी सांगूच नये कामे आपणच करणार आहे. पूर्वी कामे आपण करायचो उद्घाटन दुसरीच करायचे. शहरासाठी तरंगवाडी तलावातील पाणी आणणार. शहरात नवीन व्हीव्हीआयपी विश्राम ग्रहाचे काम सुरू केले आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. ज्यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केलं त्यांना सोबत घेऊन काम करायचे आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत, असंही भरणे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Buldhana Crime : बुलढाण्यात 'चेक इन करंसी'च्या नावाखाली 1 लाखात 5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा