एक्स्प्लोर

ती वेळ येऊ शकते, मोदी सरकार पहिल्यांदा...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

मोदी सरकारची एकूण धोरणे आणि कारभार पाहता ही वेळ येऊही शकते, असा इशारा आजच्या सामना अग्रलेखातून दिला आहे. 

Samana Agralekh: महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि इतर आर्थिक धोरणे, केंद्रीय यंत्रणांचा दहशतवाद, धार्मिक-सामाजिक अशांतता हेच देशातील सध्याचे चित्र आहे. प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सरकार आणि राज्यकर्त्यांवरील जनतेचा विश्वास उडत आहे. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेला ‘लोकांच्या हातात कायदा द्या’ हा संताप अनाठायी नाही. आज न्यायालय जे बोलले ते उद्या देशातील जनताच बोलू शकते आणि त्यानुसार कृतीही करू शकते. मोदी सरकारची एकूण धोरणे आणि कारभार पाहता ही वेळ येऊही शकते, असा इशारा आजच्या सामना अग्रलेखातून दिला आहे. 

कायद्याची कठोर अंमलबजावणी करता येत नसेल तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या आणि त्यांनाच काय करायचे ते करू द्या, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पडलेला बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा आणि तो सोडविण्यात सरकार तसेच इतर यंत्रणांना आलेले अपयश यावरून न्यायालयाने सरकारचे हे वस्त्रहरण केले. मुंबईच नव्हे तर राज्यात सर्वच शहरांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. याच वस्तुस्थितीवर उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान बोट ठेवले आणि राज्य सरकारचे कान उपटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गावर असलेल्या बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश न्यायालयाने मध्यंतरी दिले होते. त्यानुसार कारवाईदेखील झाली होती, परंतु जे इतरत्र घडते तेच येथेही घडले. हटविलेल्या फेरीवाल्यांनी पुन्हा तेथे त्यांचे बस्तान बसविले आणि त्यांना हटविणारी यंत्रणादेखील 'हाताची घडी तोंडाला कुलूप' लावून शांत बसली. 

महागाई हटविण्याच्या गमजा मारीत मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आले-

सरकारच्या याच बेपर्वाईचा उच्च न्यायालयाने समाचार घेतला आणि 'मग जनतेलाच कायदा हातात घेऊ द्या,' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. आता न्यायव्यवस्थेनेच अशा शब्दांत बोलावे का,   मांडली जातील; परंतु आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचीच परिस्थिती न्यायालयाने दिलेल्या इशाऱ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांबाबत असले तरी देशात मागील काही वर्षांत जे काही घडते आहे, घडविले जात आहे किंवा घडत असताना राज्यकर्ते ज्या पद्धतीने बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यावरून आपल्या देशातील जनतेवर कायदा हातात घेण्याची वेळ येणार असेच चित्र आहे. मोदी सरकार बाता मोठमोठ्या करीत असले तरी सर्वच क्षेत्रांत देशाची आणि जनतेची अवस्था बिकट झाली आहे. महागाई हटविण्याच्या गमजा मारीत मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. आज दहा वर्षांनंतर काय स्थिती आहे? मोदींच्या पक्षाने ज्या 'महंगाई डायन'चा बागुलबुवा त्या वेळी उभा केला होता ती 'महंगाई डायन' त्यापेक्षा अधिक उग्र रूपात जनतेच्या बोकांडी बसली आहे. सरकार एकीकडे 'पाच ट्रिलियन' अर्थव्यवस्थेची पतंगबाजी करीत आहे आणि दुसरीकडे देशाचा'जीडीपी' घसरत आहे. रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी गेल्याच आठवड्यात हा इशारा दिला आहे.

'लोकांच्या हातात कायदा द्या' हा संताप अनाठायी नाही-

एकीकडे महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी अशा कोंडीत जनता सापडली आहे. शेतकऱ्याची अवस्थाही वेगळी नाही. शेतमालाला 'किमान वाजवी दर' देण्याचे आश्वासन 10 वर्षांपूर्वी देणारे मोदी आजही ते पूर्ण करण्यास चालढकल करीत आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांना भर थंडीत नवीन लढाईचे रणशिंग पुन्हा फुंकावे लागले आहे. मोदी राजवटीत देशातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजघटकांत अस्वस्थता आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि इतर आर्थिक धोरणे, केंद्रीय यंत्रणांचा दहशतवाद, धार्मिक-सामाजिक अशांतता हेच देशातील सध्याचे चित्र आहे. प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सरकार आणि राज्यकर्त्यांवरील जनतेचा विश्वास उडत आहे. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेला 'लोकांच्या हातात कायदा द्या' हा संताप अनाठायी नाही. आज न्यायालय जे बोलले ते उद्या देशातील जनताच बोलू शकते आणि त्यानुसार कृतीही करू शकते. मोदी सरकारची एकूण धोरणे आणि कारभार पाहता ही वेळ येऊही शकते...असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संबंधित बातमी:

Maharashtra Goverment: उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार; फडणवीस-शिंदेंमध्ये बैठक, नागपुरात तयारीला वेग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget