कोकणात ठाकरे गटात वादाची ठिणगी; भास्कर जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखानं दंड थोपटले, नेमकं घडलंय काय?
लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एकाच गावात दिसले, आता आभाराचं नाटक कशाला, असं म्हणत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Maharashtra Konkan News: रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) शिवसेनेच्या उबाठा गटात (Shiv Sena Thackeray Group) वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एकाच गावात दिसले, आता आभाराचं नाटक कशाला, असं म्हणत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख संदीप सावंत यांनी भास्कर जाधवांवर टीकास्त्र डागलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एकाच गावात दिसले, आता आभाराचं नाटक कशाला, असं म्हणत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा गमावल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हा कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले आहेत. याच कारणानं तालुकाप्रमुख पदावरून तडकाफडकी बाजूला केल्यामुळे संतप्त झालेल्या संदीप सावंत यांनी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एका गावातच दिसले : शिवसेना माजी तालुका प्रमुख
तालुकाप्रमुख पदावरून तडकाफडकी बाजूला केल्यामुळे संतप्त झालेल्या संदीप सावंत यांचा शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावरती हल्लाबोल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातल्या फक्त एका गावातच दिसले, असे असताना आता आभाराचे नाटक कशासाठी. शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखांचा भास्कर जाधव यांना थेट सवाल विचारण्यात आला आहे.
माझं काय चुकलं याचं उत्तर द्या, नाहीतर करारा जवाब मिलेगा. संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान दिलं आहे. संदीप सावंत हे चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुकाप्रमुख होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघटनात्मक केलेल्या फेरबदलावर नाराज झालेल्या संदीप सावंत यांनी भास्कर जाधववांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
मी सुनील तटकरे यांच्याकडून दहा कोटी मागून दोन कोटी घेतले म्हणून मला बाजूला केलं का? असं म्हणत संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर मतदार संघात तुम्हाला लोकांना उत्तर द्यावं लागेल, असा इशाराही संदीप सावंत यांनी दिला आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, अन्याय होत असेल तर शांत बसू नका, ही बाळासाहेबांची शिकवण, त्यामुळे मी शांत बसणार नाही, असं संदीप सावंत म्हणाले आहेत.
भास्कर जाधव यांच्या आजच्या आभार कार्यक्रमावर संदीप सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. रात्रंदिवस फिरून आम्ही काम केलं आम्ही लीड दिलाय. तुम्ही वेळ दिला असता तर आणखी लीड मिळाला असता, असंही संदीप सावंत म्हणाले आहेत.