मोठी बातमी: काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या हालचाली, शिवानी वडेट्टीवारांसह युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं काय झालं?
Nagpur News : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने त्यांच्या जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Nagpur News : संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनामध्ये दांडी मारल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने त्यांच्या जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
शिवानी वडेट्टीवारांसह अनेकांची उचलबांगडी
पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
युवक काँग्रेसने काल नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन अचानक पुकारले होते. मात्र या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले असताना अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे अवघ्या 50- 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली होती. मात्र अवघ्या 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच अडवले होते आणि संघ मुख्यालय घेराव घालण्यासाठी निघालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयापासून पन्नास पाऊल ही पुढे जाऊ शकले नव्हते. त्यामुळेच तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील साठ पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.
सरसंघचालकांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन
'अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वात नागपूरातील देवडिया काँग्रेस भवनमधून निघून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या दिशेने निघाले. मात्र विनापरवानगी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्यापासून पोलिसांनी मध्येच रोखले. असे असताना अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने त्यांच्या जबाबदारी पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















