शशी थरूर यांची इंग्रजी पुन्हा चर्चेत; Quomodocunquize म्हणत रेल्वेला केलं लक्ष्य, अर्थ जाणून घेण्यासाठी काढावी लागली डिक्शनरी
Shashi Tharoor New Word: काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या उत्कृष्ट इंग्रजीसाठी ओळखले जातात. असे अनेक प्रसंग आले आहेत,
Shashi Tharoor New Word: काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या उत्कृष्ट इंग्रजीसाठी ओळखले जातात. असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा शशी थरूर यांनी वापरलेल्या इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना डिक्शनरी काढावी लागली आहे. यावेळी शशी थरूर यांनी भारतीय रेल्वे आणि रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आणि यासाठी त्यांनी वापरलेला इंग्रजी शब्द क्वचितच कोणी ऐकला असेल.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, 'अस्पष्ट शब्द विभाग: भारतीय रेल्वेने Quomodoconquize करावे का?' थरूर यांच्या या ट्विटनंतर लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा नवा इंग्रजी शब्द वाचून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या शब्दाचा अर्थ फार कमी लोकांना माहित असेल, हे कदाचित शशी थरूर यांनाही माहित असावे, म्हणून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये या शब्दाचा अर्थ देखील सांगितला आहे.
शशी थरूर यांनी स्वतः या शब्दाचा अर्थ सांगितला
शशी थरूर म्हणाले की, Quomodocunquize म्हणजे 'कोणत्याही किंमतीत पैसे कमवणे'. थरूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयालाही टॅग केले आणि "ज्येष्ठ नागरिक सवलत" हा हॅशटॅग वापरला.
Obscure Words Deptt:
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 22, 2022
Must the Indian Railways quomodocunquize? @RailMinIndia #SeniorCitizensConcession#IndianRailway pic.twitter.com/CAsGDaDKAf
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला
शशी थरूर यांनी या ट्विटद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते की, रेल्वेने यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर दिलेली सवलत पुन्हा लागू केली जाणार नाही. रेल्वेमंत्र्यांच्या या वक्तव्यावर शशी थरूर यांनी Quomodoconquize असा शब्द वापरून ट्वीट केले आहे.
दरम्यान, लोकांनी त्यांच्या शब्दसंग्रहात आणखी शब्द Quockerwodger जोडावा, असे गेल्या महिन्यात शशी थरूर म्हणाले होते. या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना शशी थरूर म्हणाले होते की, “Quockerwodger ही एक प्रकारची लाकडी बाहुली आहे. ते म्हणाले की, हा शब्द 1860 सालातील आहे.