अमित शाहांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यांचे विधिमंडळात पडसाद, विरोधकांकडून संतप्त सवाल
Congress On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली आहे.
Congress On Amit Shah : राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एक वक्तव्य केलं. यावेळी अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. “त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती,” असे शाह म्हणाले. राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले.
दरम्यान, याच मुद्यावरून काँग्रेस आणि विरोधक आक्रमक झाले असून अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. शाह यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी आग्रही मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली आहे. अशातच अमित शाहांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यांचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांनी या वक्तव्यावर शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे आंबेडकरांशी त्यांचे मतभेद असतील. अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केला आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड , रजनी पाटील, प्रशांत पडोळे इत्यादीसह अनेक नेते या निदर्शनात सहभागी झाले आहे. दरम्यान वक्तव्याचे पडसाद आता राज्याच्या विधिमंडळात देखील उमटताना दिसत आहेत.
आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वावडं का?- नितीन राऊत
या विषयी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वांवडं का? हा देशाचा अवमान आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वस्वी असल्याचे ते म्हणाले. तर यावर बोलताना भाजप आमदार अशिष शेलार म्हणाले की, संसदेचा मुद्दा या ठिकाणी कसा मांडला जातो? काही नियम आहेत की नाही? आम्हाला मार्गदर्शन करा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा कांग्रेस ने केला असल्याचे अशिष शेलार म्हणाले.
“अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 18, 2024
इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता” : अमित शाह..!#Ambedkar
आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही
पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले.मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्या मुळे… pic.twitter.com/mYtskFOybK
हे ही वाचा