एक्स्प्लोर

Eknath Shinde: राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस, कोत्या वृत्तीचा नाही; एकनाथ शिंदेंकडून मनसेबाबत सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: महायुतीमध्ये काहीच वाद नाही, तडजोड करावी लागते. अजित पवार सोबत आल्याने त्यांना जागावाटपात सामावून घेण्याची गरज होती. मी भाजपचं ऐकतो, ही गोष्ट पूर्णपणे चूक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. ते सत्तेबाहेर असले तरी लोकांना न्याय मिळावा आणि त्यांची कामं झाली पाहिजेत, ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भावना आहे. राज ठाकरे हा अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे, तो कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचा नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. तसेच आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला त्यांचा वाटा मिळू शकतो, असे संकेतही दिले. काँग्रेस पक्षाने देशाला 50-60 वर्षात खड्ड्यात घातले. पण मोदीजी देशाचा विकास करत आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्यांनी घरी बसणाऱ्यांना आणि फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना किंवा शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का? राज ठाकरे यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज ठाकरेंमुळे महायुतीला फायदा होईल का? एकनाथ शिंदे म्हणाले...

महायुतील राज ठाकरे यांची काय गरज होती, त्यांच्या येण्याने शिंदे गटाची अडचण झाली का, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही लवकरच एकत्र दिसू. याशिवाय, राज ठाकरे  स्वतंत्रपणे सभा घेतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देणार का, एकनाथ शिंदे म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गट दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरु आहे. याविषयी विचारले असता एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मिलिंद नार्वेकर आणि माझा सध्या संपर्क नाही. मी त्यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. ते उबाठामध्ये आहेत, तिकडे त्यांना सुखी राहू दे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

आणखी वाचा

राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Embed widget